विधानसभेची परतफेड ! सांगोल्यात शेकाप-भाजप युती, शहाजीबापू एकाकी झुंज देतील का?
Sangola Municipal Council election: सोलापूरमध्ये पुन्हा उभारी घेण्यासाठी भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जोरदार प्रयत्न.
Sangola Municipal Council election-सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिकांसाठी चुरशीची निवडणूक होत आहे. त्यात अकलूज आणि सांगोला नगरपालिकेसाठी मोठा राजकीय संघर्ष होताना दिसतोय. त्यात सांगोल्यामध्ये वेगळंच राजकीरण समीकरण उभं राहिलंय. येथे शिवसेनेचे माजी आमदार शहाजाबापू पाटील हे एकटे पडलेत. त्यांच्याविरोधात भाजप, शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आलीय. त्यामुळे सांगोला नगरपालिकेची निवडणूक कशी चुरशीची होत आहे. शहाजीबापूंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर (Jaykumar Gore) कोणता गंभीर आरोप केलाय. शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) महाआघाडीतून कोण मदतीला आलंय. तेच पाहुया…
धक्कादायक! आरक्षणाच्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचे नगरपरिषदांमध्ये तीनतेरा; वाचा, सविस्तर
सोलापूर जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपाला झटका बसला. त्यामुळे सोलापूरमध्ये पुन्हा उभारी घेण्यासाठी भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जोरदार प्रयत्न केले जातायत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. येथील नगरपालिका जिंकण्यासाठी जयकुमार गोरेंनी रणनिती आखली आहे. पण सांगोल्यात त्यांनी थेट महायुतीतील शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांनाच घेरले आहे.
तिन्ही पक्षांचा स्वबळाचा नारा पण…
सांगोल्यात शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षाने स्वबळाचा नारा देत नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले होते. शेकापने मारुती बनकर यांना उमेदवारी दिली होती. तर शिंदेंच्या शिवसेनेने माजी नगराध्यक्षा राणी माने यांचे पती आनंदा माने यांना उमेदवारी दिली. पण भाजपला नगराध्यक्षपदासाठी तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता. त्यात पालकमंत्री जयकुमार गोरेंनी एक राजकीय खेळी केली. शेकापचे उमेदवार मारुती बनकर यांचा भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यानंतर शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला कुठलाही विरोध दर्शविला नाही. थेट शेकापने भाजपला पाठिंबा दिला. ठाकरे गटाकडून विधानसभा लढणारे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात स्थानिक विरोधही हे एकत्र आले.
शहाजीबापूंचा तडजोडीला नकार थेट रिंगणात उतरले
ही नगरपालिका बिनविरोध होते का असा प्रयत्न भाजपकडून होते. तशी ऑफर शहाजीबापूंना आली होती. उपनगराध्यक्ष आणि सहा-सात नगरसेवक मिळणार होते, असे शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत सांगितले आहे. परंतु बापुंनी तडजोड न करता थेट शिवसेनेचा पॅनल रिंगणात उतरविला. एकनाथ शिंदे यांनीही बापूंना लढण्याचे बळ दिले आणि सांगोल्यात सभाही घेतली. विरोधकांना वाटत असेल शहाजीबापूंचा कार्यक्रम केलाय. पण तुमच्यामागे मी आहे, असे शिंदे म्हणाले.
देशमुखांकडून विधानसभेची परतफेड ?
शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना आमदारकीला मदत केल्याचे जाहीरपणे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. त्यावरून शिंदेंचा उमेदवार पाडण्यासाठी भाजपने मदत केल्याचे उघड होत आहे. त्यावरून शहाजीबापूंनी थेट जयकुमार गोरे यांना प्रत्युत्तर दिले. जयकुमार गोरे तुमचे पैसे शेकापला पोहोचले. तेथून ते पैसे जवळ्याला दीपक साळुंके यांच्याकडे कसे गेले आहेत, हे मला माहिती आहे. कुणी पैसे पोहचविले हेही माहीत असल्याचा आरोप शहाजीबापू यांनी केलीय.
बापूंच्या मदतीला उत्तमराव जानकर
शहाजीबापूंविरोधात तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. परंतु शरद पवार गटाचे माळशिरस मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर हे शहाजीबापू पाटील यांच्या मदतीला आले आहे. सांगोल्यात सभेत ते एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर दिसून आले आहेत. त्यामुळे जानकर हे बापूंना मदत करत असल्याचे दिसून येत आहे.
शहाजीबापू पाटील यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यावर टीका केली. ते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे वारस नाहीत. गणपतराव देशमुख आणि मीच सांगोल्याचा राजा असल्याचे शहाजीबापू यांनी म्हटलंय. सांगोल्यावर कुणाचे वर्चस्व राहिल आणि कोण राजा ठरेल हे येत्या 3 डिसेंबर मतमोजणीत समोर येईल.
