शरद पवारांनी महागाई, बेरोजगारीवरून केंद्राला फटकारले, कांद्यावरून एकनाथ शिंदेंना सुनावले !

  • Written By: Published:
शरद पवारांनी महागाई, बेरोजगारीवरून केंद्राला फटकारले, कांद्यावरून एकनाथ शिंदेंना सुनावले !

कोल्हापूरः कोल्हापुरातील निर्धार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महागाई, बेरोजगारांवरून केंद्र, राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. तर कांद्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनाविताना माझ्या काळात मी कधी कांद्याच्या निर्यातीवर कर लावला नव्हता, असा टोलाही लगावला आहे. महाराष्ट्रात येणारे कारखाने गुजरातला नेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कारखाना हलवून गुजरातला संधी दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आपल्या राज्याच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा आरोपही पवारांनी केला आहे.

‘ठरवलं… खटक्यावर बोट अन् जागेवर पलटी’; रोहित पवारांचा हसन मुश्रीफांना इशारा

शरद पवार म्हणाले, लोक महागाई, बेरोजगारांनी त्रस्त झाले आहे. कष्ट करण्याची ताकद नव्या पिढीमध्ये आहे. परंतु बेरोजगारी आहे. आमच्या घामाची किंमत द्या. घाम घाळण्याची संधी द्या असे तरुण म्हणत आहे. तिच मागणी शेतकऱ्यांची आहे. यवतमाळ जिल्ह्यात अठरा दिवसांत 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. नाशिकमध्ये कांद्याची काय स्थिती आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला घामाची किंमत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करायची आहे. कांदा जगात पाठविला पाहिजे. परंतु केंद्र सरकारने चाळीस टक्के जबरदस्त शुल्क लावले आहे. परिणाम कांद्याचे भाव पडले आहे. तरीही केंद्र सरकार लक्ष देत नाहीत.

राज्यात राजकीय अस्थिरता नको, पक्षांतर बंदी कायदा कडक करा; शाहू महाराजांचा हल्लाबोल

शरद पवार हे कृषिमंत्री असताना त्यांनी कांद्यासाठी काय केले ? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले, मी कृषिमंत्री असताना मी कधीही कांद्यावर कर बसविला नाही. कांद्याच्या किंमती वाढविल्या होत्या. त्यावेळी भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून सभागृहात आले होते. त्यावेळी मी जिरायत शेतकरी कांदा पिकवतो. त्यांना सन्मानाने जगता येत आहे. तुम्ही कांद्याच्या माळा घ्याला की कवड्याच्या माळा घ्याला, असे उत्तर दिले होते, असे पवार म्हणाले.

कांद्याचे जे झाले तसेच साखरेचे होणार आहे. सप्टेंबरपर्यंत साखर निर्यात होईल. त्यानंतर साखर निर्यात होणार नाही. त्याचा ऊस उत्पादकांना फटका बसेल, असा इशाराही पवारांनी दिला आहे. दिल्लीत वर्षभर शेतकरी आंदोलनाला बसले होते. मोदी सरकारने त्याकडे ढुंकणही पाहिले नाही. शेतकऱ्यांचे असा अपमान कुणी केलेला नाही. अशा लोकांना सत्तेत दूर हटावे लागणार असल्याचे पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube