बंड की आशीर्वाद? विचारताच शरद पवार पत्रकारांवरच चिडले, म्हणाले माध्यमांचा दर्जा…

बंड की आशीर्वाद? विचारताच शरद पवार पत्रकारांवरच चिडले, म्हणाले माध्यमांचा दर्जा…

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आजपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी पक्ष पुनर्बांधणीला करण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात आज साताऱ्यातून केली आहे. शरद पवारांनी त्यांचे राजकीय गुरु असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आगामी भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला की, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हे बंड म्हणावे की आशीर्वाद असा प्रश्न केला. त्यावर मात्र शरद पवार चिडल्याचे दिसून आले. (Sharad pawar Satara press conference Ajit pawar angry at the journalists)

अजित पवारांच्या बंडावर सुजय विखेंनी सावध भूमिका; म्हणाले यामुळे राज्यात…

पवार म्हणाले की, ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं आहे,त्यांच्यावर आम्ही कोणात्याही प्रकारची अपात्रतेची कारवाई वगैरे करणार नाही. त्यावर पत्रकारांनी पवारांना विचारले की, मग याला बंड म्हणायचे की आशीर्वाद? असे विचारताच पवारांचा पारा चढला.

जयंत पाटलांनी अजित पवारांच्या विकेट काढल्या; सरचिटणीस, जिल्हाध्यक्षांची केली हकालपट्टी!

त्यावर पवार म्हणाले की, माफ करा पण तुमच्यासारखे शुद्र बुद्धीचे कोणी असेल तेच याला आशीर्वाद हा शब्द वापरेल. ज्याला एवढंं कळत नसेल की, मी जाहीरपणे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो आहे.

पक्षाची बांधणी करण्यासाठी निघालो आहे. अशावेळी पत्रकार परिषदेमध्ये आशीर्वाद असा शब्द वापरुन एकंदर पत्रकारांचा दर्जा तुम्ही खराब करु नका अशी माझी आपल्याला विनंती आहे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

यावेळी पवार म्हणाले की, देशामध्ये भाजपच्या माध्यमातून जाती-जातीमध्ये धर्मा-धर्मामध्ये एकप्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्वांशी संघर्ष करुन सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणे ही अपेक्षा सर्व सहकाऱ्यांकडून आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्त्यांना केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube