नाद करा पण आमचा कुठं! सोलापुरच्या पठ्ठ्याने गौतमीच्या कार्यक्रमासाठी मोजले ‘वारेमाप’ पैसे

नाद करा पण आमचा कुठं! सोलापुरच्या पठ्ठ्याने गौतमीच्या कार्यक्रमासाठी मोजले ‘वारेमाप’ पैसे

राज्यात सध्या एक नवीनच ट्रेंड सुरु झाला आहे. वाढदिवस, लग्न समारंभानिमित्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाला खर्चाही बराच येतो. गौतमीचा कार्यक्रम अन् तरुणांचा राडा, गोंधळ होणारच हे काय आता नवीन नाही. एका पठ्ठ्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी वारेमाप पैसे मोजले आहेत.

NCP मोठा भाऊ; अजित पवारांच्या वक्तव्यावर राऊतांचं चॅलेंज, सगळ्यांची DNA टेस्ट करू….

कार्यक्रमात कुठलाही गोंधळ, राडा, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सोलापुरच्या एका पठ्ठ्याने पोलिस बंदोबस्तासाठी सुमारे 5 लाख रुपये मोजले आहेत. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ दिसून आला नसल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत झालेल्या कार्यक्रमांमध्ये हा पहिलाच कार्यक्रम शांततेत पार पडला असल्याचं बोललं जातंय.

आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू परळी ठरणार; संजय राऊतांना विश्नास

राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस सोमा मोटे यांनी वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. सांगोला तालुक्यातल्या घेरडी इथं कार्यक्रम होता. आधीच कार्यक्रमात गोंधळ, राडा, आणि सतत वादाच्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम अडकत होता. आपल्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ, राडा, अथवा वादाचं निमित्त ठरु नये, याचा विचार करुन सोमा पोटे यांनी कार्यक्रमात मोठी गर्दी जमणार असल्याने राडा होईलच, याची गुणगुण त्यांना होती.

पुण्यातील केंद्राच्या संस्थेत विद्यार्थ्यांचा राडा; केरला स्टोरीच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी हाणामारी

गोंधळ होऊ नये, हाच विचार करुन मोटे यांनी कार्यक्रमासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा हवा असल्याचा रितसर अर्ज पोलिस ठाण्यात दिला होता. त्यानंतर कार्यक्रमात 100 पोलिस कर्मचारी आणि 6 पोलिस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. त्यामुळे गौतमीचा हा कार्यक्रम शांततेत पार पडला आहे.

…म्हणून देशाचा पंतप्रधान शिकलेला असावा; नोटबंदीच्या निर्णयावरून केजरीवालांची मोदींवर टीका

दरम्यान, कार्यक्रमाच्या कित्येक पटीने अधिक रक्कम पोलीस बंदोबस्तासाठी मोजल्याने घेरडी येथील गौतमी पाटीलच्या या अनोख्या कार्यक्रमाची संपूर्ण राज्यभर चर्चा रंगली आहे. कार्यक्रम करायचा तोपण गौतमी पाटलाचा, ठरवून कार्यक्रमही केला आणि व्यवस्थित पार पाडला. त्यामुळे सध्या ‘नाद केला, पण वाया नाही, गेला अशी चर्चा सुरू झाली आहे.

या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी सोमा मोटे यांनी सुमारे 4 लाख 75 हजार रुपये मोजले असल्याचे सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube