सिग्नल सुरु करा अन्यथा गाडी अडवू, काँग्रेसचा आयुक्तांना इशारा…

सिग्नल सुरु करा अन्यथा गाडी अडवू, काँग्रेसचा आयुक्तांना इशारा…

अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असणाऱ्या डीएसपी चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा चौक मनपाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. याच रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या रस्त्याने शहरातील नागरिकांसह शहराबाहेरील वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक सुरू असते. सतत मोठी वर्दळ असते. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ सिग्नल सुरू करा अशी मागणी शहर काँग्रेसने केली आहे. अन्यथा या चौकातून आयुक्तांची गाडी जाताना दिसल्यास ती अडवू, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.

Ajit Pawar : संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं?

यावेळी आयुक्तांना त्यांच्या निष्क्रियतेबद्दल गुलाब पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. मनपा आयुक्त पंकज जावळेंची काँग्रेस शिष्टमंडळाने काळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, शैलाताई लांडे, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, आकाश आल्हाट, किशोर कांबळे, आकाश गायकवाड, गौरव घोरपडे, सुनील लांडगे, विकास भिंगारदिवे, सोफियान रंगरेज, गणेश आपरे, धनंजय देशमुख, प्रणव मकासरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eka Kale Che Mani: विनोदी मराठी वेब सिरीज ‘एका काळेचे मणी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज!

काळे म्हणाले की, वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून सध्या वाहतूक नियंत्रण केले जाते. मात्र वाहतुकीचे योग्य प्रकारे संचलन होण्यास अडथळा निर्माण होऊन अनेकदा ट्राफिक जाम होते. मनपा कार्यालया जवळ असणारा सिग्नलच बंद असून देखील मनपा झोपलेली आहे. तीन महत्त्वाच्या शासकीय कार्यालयां जवळ असणारा सिग्नल बंद आहे.

Maharashtrachi Hasyajatra फेम शिवाली परब करते कॉफी पार्टनरची प्रतिक्षा? पोस्ट शेअर करत म्हणाली…

आयुक्त सुस्त असल्यामुळे सिग्नल बंद आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे नागरिकांच्या गैरसोयीकडे आयुक्तांचे लक्ष नाही. नागरी प्रश्नांबद्दलच्या ते असंवेदनशील व अकार्यक्षम आहेत. निवेदनात म्हटले आहे की, मनपाने जरी या प्रश्नात स्वतःहून लक्ष घातले नसले तरी शहर काँग्रेस ही नागरिकांच्या वतीने जागरुक असून आता काँग्रेसने लेखी निवेदनाद्वारे मनपाचे या समस्येकडे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय तात्काळ दूर करण्यासाठी सदर सिग्नल तात्काळ सुरू करण्याबाबत मनपाने कार्यवाही करण्याची काँग्रेसने मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देखील समक्ष देत त्यांच्याकडे देखील याबाबत मागणी करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube