Sujay Vikhe Patil : सहकाराला राजकीय रंग दिल्याने विरोधकांना आरसा दाखवला…

Sujay Vikhe Patil : सहकाराला राजकीय रंग दिल्याने विरोधकांना आरसा दाखवला…

अहमदनगर : विरोधी पक्षनेत्यांनी भाजपच्या संचालकांना डावलून बैठक घेतल्याने विरोधकांना जिल्हा बॅंक निवडणुकीच्या निमित्ताने संचालकांनी आरसा दाखवल्याचा टोला खासदार सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला आहे.

कर्जातही महिलांचा टक्का वाढला, पुरुषांना टाकले मागे; वाचा, काय सांगतोय अहवाल ?

आज अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक पार पडली. निवडणुकीत भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला. शिवाजी कर्डिले विजयी झाल्यानंतर त्यांचा सत्कार खासदार डॉ. विखे पाटील यांनी केला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

मविआने थोपटले दंड… छत्रपती संभाजीनगरमधून पहिली तोफ धडाडणार

खासदार विखे म्हणाले, जिल्हा सहकारी बँकेतील सर्व संचालकांना विश्वासात न घेता सहकारामध्ये राजकीय रंग देण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडण्यासाठी नाईलाजाने निवडणूक लढवावी लागल्याचं विखे यांनी स्पष्ट केलं आहे.

चौथ्या कसोटीत इशान किशन की केएस भरत नेमकं कोणाला मिळणार संधी ? राहुल द्रविडने दिला इशारा

तसेच विरोधकांना या निवडणुकीमुळे भाजपमध्ये कुठलीही विसंगती नसल्याचा नक्कीच बोध झाला असेल. भाजपच्या संचालकांना विश्वासात घेतले असते, तर कदाचित ही निवडणूक झाली नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

विरोधकांकडून सहाकारात रंग देण्याचा प्रकार घडला आहे, त्यामुळे आता यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच बॅंकेचा कारभार केला जाणार असल्याच सुजय विखे यांनी ठामपणे सांगितलं आहे.

दरम्यान, जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात घुले परिवाराचं मोठं योगदान असून सहकारात राजकारण नको हीच आमची भूमिका असल्याचं खासदार सुजय विखे पाटलांनी सांगितलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube