छावणी परिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार.., आमदार जगतापांनी दिला नारा
अहमदनगर : भिंगार छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 30 एप्रिलला मतदार पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचा नारा आमदार जगताप यांनी दिला.
‘रेडक्रॉस’वर सीबीआयची रेड, भ्रष्टाचाराची चौकशी#RedCross #RedCrossSociety #CBI https://t.co/wXXOVYoBh3
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 13, 2023
यावेळी बैठकीत बोलताना आमदार जगताप म्हणाले, भिंगार छावणी परिषदेची निवडणूक आपण पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. यामध्ये सातही प्रभागात आपण उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
पंढरपूरच्या माउली कॉरिडॉरसाठी विधिमंडळात बैठक, स्थानिकांच्या मागण्याचा विचार होणार?
तसेच भिंगार शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी जनतेत जाऊन कामं करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
काळ्या कटआऊटमध्ये दीपिकाचा हटके लूक…
छावणी मंडळाच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवलं होतं. मागील पंचवार्षिक निवडणूक 2015 साली झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुस्सादिक सय्यद यांची छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.
नाथषष्ठी सोहळ्यात विखे-दानवेंची फुगडी…
आता या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. येत्या 23 मार्च रोजी या निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येणार आहेत.
त्यानंतर उमेदवारांसाठी 31 मार्चला अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 6 एप्रिल रोजी निवडणूक चिन्हांसह उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर 30 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर रसल डिसुजा यांनी 28 फेब्रुवारी रोजी छावणी परिषदेच्या निवडणुकीबाबत अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी होताच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
लाऊड-स्पीकरवर ओरडण्याची.., अजानवर भाजप नेते के. एस. ईश्वरप्पा यांचं वादग्रस्त विधान
भिंगार शहरातील एकूण 7 वार्डांसाठी मतदान होणार असून त्यापैकी वार्ड क्रमांक 4 आणि वार्ड क्रमांक 6 महिला राखीव तर वार्ड क्रमांक 7 अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.