साडेतीन वर्षाच्या बाळाचे अपहरण, पोलिसांनी केली ३ तासात सुटका, आरोपीला घेतले ताब्यात

साडेतीन वर्षाच्या बाळाचे अपहरण, पोलिसांनी केली ३ तासात सुटका, आरोपीला घेतले ताब्यात

अहमदनगर : दिवसेंदिवस अहमदनगर (Ahmednagar) शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढू लागली आहे. नुकतीच गुन्हेगारीचा एक घटना समोर आली. अवघ्या साडेतीन वर्षाच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) अवघ्या तीन तासात पकडले आहे. दरम्यान पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. असं असले तरी जिल्ह्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची नागरिकांची भावना आहे. (The city police caught the abductor of a three and a half year old baby within three hours)

याबाबत अधिक माहिती अशी आज रविवारी (दि.१६ जुलै) रोजी सुमारास चेतना कॉलनी येथील रहीवासी असलेल्या फिर्यादी या दुपारच्या सुमारास भाडोत्री खोली बघण्याकरीता गेले होते. त्यावेळी त्यांचे सोबत आपला साडेतीन वर्षांचा मुलगा प्रतिक हा देखील होता. फिर्यादी चेतना कॉलनी येथे भाड्याने रुम पाहत असताना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर उभा होता. फिर्यादी रुम पाहून खाली आल्यावर त्यांना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर दिसला नाही. त्यांनी आजूबाजुला प्रतिकचा शोध घेतला. मात्र, प्रतिक सापडला नाही. आपला तीन वर्षाचा मुलगा प्रतिक आपण बघितला का, अशी चौकशी त्यांनी स्थानिकांकडे केली. तेव्हा स्थानिकांनी आत्ताच थोडया वेळापूर्वी ३०-३२ वर्षाच्या एक इसम एक छोट्या मुलाला आपल्यासोबत घेऊन गेला. ही माहिती मिळाल्यावर फिर्यादी यांची खात्री झाली की प्रतिकला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले आहे.

Ahmednagar Politics : शिर्डीच्या खासदाराची चलबिचल, थेट भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांच्या भेटीला 

त्यांनी लगेच डायल ११२ यावर फोन करुन मुलगा प्रतिक यास एक अनोळखी इसमाने माझ्या संमत्ती शिवाय घेवून गेला, अशी तक्रारकेली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी स.पो.नि.राजेंद्र सानप यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन ताबडतोब घटना स्थळी जाऊन भेट दिली. त्यांनी तात्काळ एक पथक तयार केले. या पथकाला मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परीसरात एक इसम एका लहान मुलासह संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परीसरात शोध घेतला असता तिथं एक इसम हा एका मुलासोबत दिसून आला. त्यालालगेच फिर्यादी यांना तो मुलगा दाखवला असता फिर्यादीने हा आपलाच प्रतिक असल्याचं सांगितलं.

त्यानंतर मुलाला पळवून नेणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. देवेंद्र बबन थोरात (रा. शेवगाव) असं आरोपीचं नाव आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे..

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube