श्रीवर्धन नगरपालिकेत मोठा ट्विस्ट; ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडून आलेला उमेदवार करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश?

अतुल चौगुले नगराध्यक्ष पदावर विजयी झाल्यानंतर काही वेळातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर

  • Written By: Published:
Untitled Design (135)

Will the candidate elected from Thackeray’s Shiv Sena join Shinde’s Shiv Sena? : गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर गेलेला नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल(Election Results) आज जाहीर झाला आहे. श्रीवर्धन नगरपालिकेत एक लक्षवेधी घटना घडली आहे. श्रीवर्धन नगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अतुल चौगुले(Atul Chaugule) हे विजयी झाले आहेत. मात्र त्यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर या निवडणुकीत एक ट्विस्ट पाहायला मिळाला. नगराध्यक्ष पदावर विजयी झाल्यानंतर काही वेळातच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत(Shivsena) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडाली आहे.

अतुल चौगुले यांच्या विजयाची बातमी समजताच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हे तात्काळ श्रीवर्धनला पोहोचले आणि अतुल चौगुले यांचं अभिनंदन केलं. या भेटीनंतर अतुल चौगुले आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जल्लोष केला. भरत गोगावले यांच्या या खेळीमुळे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. याबाबत भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यांची शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे बोलताना त्यांनी हा देखील उल्लेख केला की, शिवसेनेनेन त्यांना श्रीवर्धनमध्ये मदत केली. ते हे कधीही विसरणार नाहीत. आम्ही गनिमीकाव्याने युद्ध केलं असून त्यात आमचा विजय झाला असल्याचं वक्तव्य यावेळी आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे.

नगरपरिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांनी एकत्र येत केलेल्या युतीच्या विरोधात शहाजीबापू पाटील यांच्या पॅनलचं वर्चस्व

नगराध्यक्ष झाल्यानंतर ठाकरे सेनेचे उमेदवार अतुल चौगुले यांनी जाहीरपणे भरत गोगावले यांचे आभार मानले. माझ्या विजयात भरत गोगावले यांचा मोठा वाट असल्याचं त्यांनी यावेळी मान्य केलं. हे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे यश आहे. श्रीवर्धनमधील लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. या निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. पण श्रीवर्धनच्या जनतेने हे नाकारले. दोन्ही शिवसेना, काँग्रेस, शरद पवार गट, शेकाप आणि अजित पवार गटातील असंतुष्टांनी मला मदत केली. मी या सगळ्यांचा ऋणी आहे, असे अतुल चौगुले यांनी म्हटले. दरम्यान, अतुल चौगुले यांची शिंदे गटाशी ही वाढलेली जवळीक उद्धव ठाकरे यांना कितपत रुचणार, हा प्रश्न आहे. यावर ठाकरे गटातून काही प्रतिक्रिया येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

follow us