मुख्यमंत्री खोट बोलतात पण रेटून बोलतात; आदित्य ठाकरेंची जहरी टीका

मुख्यमंत्री खोट बोलतात पण रेटून बोलतात; आदित्य ठाकरेंची जहरी टीका

Aaditya Thackeray On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) खोटं बोलतात पण रेटून बोलतात, अशी जहरी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा वातावरण तापलं आहे. सरकारने अध्यादेशाबाबत कायदा पारित करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंतरवली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. ते मुंबईत बोलत होते.

नानांनी मोदींवर आरोप करुन स्टंटबाजी केली होती; बावनकुळेंकडून शिळ्या कडीला ऊत

आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईत मराठा समाजासमोर हे सगळं जाहीर झालं तेव्हा मी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मुख्यमंत्री खोट बोलतात पण रेटून बोलतात
लाज नसल्यासारखं खोटं बोलतात, त्यांनी मराठा समाजाला आश्वासने दिली पण पूर्ण झाली नाहीत. मराठा समाज पूर्णपणे एकत्र आला होता त्यांच्यासमोर आश्वासने दिली होती.

काँग्रेसला मोठा धक्का : कार्यकारी अध्यक्षाचा तीन आमदारांसह भाजपच्या सरकाराला थेट पाठिंबा

राज्यातील ओबीसी समाज, धनगर समाज, प्रत्येक घटक महिला, कोणीही खूश नाही. नोकर भरती, तलाठी भरतीचा विषय प्रलंबित असून आश्वासने मिळताहेत पूर्ण होत नाहीत. इतर राज्यांचं सरकार केंद्र सरकारला जीएसटी मागत आहेत. त्यांचे हक्क मागत आहे पण आपलं सरकार केंद्रापुढे लोटांगण घालत आहे कुठेही हक्क मागताना दिसत नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

‘अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील?’ ठाकरे गटाचा मोदी सरकारला खोचक सवाल

तसेच सरकारकडून जनतेला फक्त आश्वासनेच मिळालेली आहेत ती आश्वासने अद्याप कुठेही पूर्ण झालेली नाहीत. पूर्ण समाजाला मुख्यमंत्र्यांनी फसवलं आहे, सरकारकडून त्यांना काय प्रतिसाद मिळतोयं हे आपण पाहतोयं. काँग्रेस आता भाजपमधूनच बहुमत साध्य करणार आहे. भाजपवाले अर्धे उमेदवार आरोप झालेले घेतात. त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुतात. जे कोणी भाजपचे, संघाचे आहेत ते वीच-पंचवीस वर्षे जे लढले ते कार्यकर्ते कुठेच दिसत नाही. एखादं मंदिराचं न्यास, महामंडळ काहीच नाही मिळालं त्यांच्याबद्दल वाईट वाटतं असून भाजप संपत चालली असल्याचीही टीका ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube