भायखळ्यात मोठी दुर्घटना! इमारत पायाभरणीवेळी अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
भायखळ्यात एका कंट्रक्शन साईटचं काम सुरु होतं. इथे इमारतीच्या पायाभरणीचं काम सुरु होतं. त्यासाठी माती खणण्याचं काम सुरु होतं.
मुंबईतील भायखळ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. (Mumbai) येथील एका इमारतीचा काही भाग कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भायखळ्यातील हंस रोडवर हबीब मेन्शन या परिसरात ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर तातडीने बचाव कार्य करण्यात आलं. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.
भायखळ्यात एका कंट्रक्शन साईटचं काम सुरु होतं. इथे इमारतीच्या पायाभरणीचं काम सुरु होतं. त्यासाठी माती खणण्याचं काम सुरु होतं. पण या कामादरम्यान मातीचा भलामोठा ढिगारा कामगारांवर कोसळला. या घटनेनंतर कामगारांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवले पूल अपघात घटनेनंतर खासदार अॅक्शन मोडवर, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना
माती आणि मुरुम बांधकाम करणाऱ्या पाच कामगारांवर कोसळलं. या घटनेत पाच कामगार जखमी झाले. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना कामगारांना तातडीने उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, दोन रुग्णांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आलं. तर, तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एकूण पाच कामगारांना रुग्णालयात आणण्यात आलं. त्यापैकी दोन जणांना मृत घोषित करण्यात आले असून तीन मजूर जखमी आहेत. राहुल (30) , राजू (28) असे मृत झालेल्या कामगारांचे नाव आहे. सज्जाद अली (25), सोबत अली (28), लाल मोहम्मद (18) असे जखमी कामगारांचे नाव आहे.
