Atul Bedekar : मराठमोळ्या लोणचं-मसाल्यांना जगभरात पोहचवणाऱ्या अतुल बेडेकरांचं निधन

Atul Bedekar : मराठमोळ्या लोणचं-मसाल्यांना जगभरात पोहचवणाऱ्या अतुल बेडेकरांचं निधन

Atul Bedekar : बेडेकर मसाले आणि लोणचे फेम अतुल बेडेकर यांचं निधन झालं. त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. ते मराठी खाद्यसंस्कृतीतील मसाले आणि लोणचे जगभरात पोहचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचे धडाडीचे वारसदार होते. तसेच ते सध्या व्ही पी बेडेकर अॅंड सन्सचे संचालक होते.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’सुरू होणार नवे पर्व; समृद्धी अन् शहजादा दिसणार मुख्य भूमिकेत

व्ही पी बेडेकर अॅंड सन्सचा जगभरामध्ये लोणची, मसाले, चटणी या पारंरपारिक मराठमोळ्या खाद्यपदार्थांना प्रतिष्ठा देण्यामध्ये मोठा वाटा आहे. 1910 मध्ये विश्वनाथ परशुराम बेडेकर यांनी मुंबईतील गिरगावमध्ये लोणचं आणि मसाल्याचं एक दुकान सुरू केलं होतं. हळुहळू मालाचा खप वाढला. दुकानांच्या शाखा सुरू झाल्या.

Curative petiton म्हणजे नक्की काय? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi

त्यानंतर दादर, फोर्टेमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची पाच दुकानं झाली. 1943 मध्ये ‘व्ही पी बेडेकर अॅंड सन्स लिमिटेड’ असं कंपनीचं नाव ठेवण्यात आलं. त्यामुळे गेल्या शतकापासून या परिवाराने आणि उद्योग समुहाने एक मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लेणचे आणि पापड यांच्या माध्यामातून घराघरात स्थान निर्माण केले.

दरम्यान त्यांच्या या निधनामुळे जुन्य-नव्या पिढ्यांचा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने आघात सहन करण्याची शक्ती बेडेकर परिवाराला मिळो. ही ईश्वरचरणी पार्थना अशी भावना त्यांच्या निधमनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तेसच त्यांन अतुल बेडेकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube