भारती लव्हेकरांकडून प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे ‘भव्य’ आयोजन : हजारोंनी घेतला महाभंडाऱ्याचा लाभ

भारती लव्हेकरांकडून प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे ‘भव्य’ आयोजन : हजारोंनी घेतला महाभंडाऱ्याचा लाभ

मुंबई : अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा नुकताच पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे हा सोहळा द्विगुणित झाला. (BJP’s Versova MLA Dr. Bharti Lovekar organized grand replica darshan ceremony of Shri Ram Temple )

देशाच्या इतर भागातही हा सोहळा साजरा करण्यासाठी विविव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर (MLA Dr. Bharti Lovekar ) यांनीही अशाच भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी आयोजित केलेल्या श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिकृती दर्शन सोहळ्याला भाविकांनी तुफान गर्दी केली होती. सोबतच यावेळी प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्याचे हजारो भाविकांनी थेट प्रक्षेपण बघून दर्शन घेतले. शिवाय जवळपास 20 हजार भाविकांनी महाभंडाराचा लाभ घेतला.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाकडून श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात अन् अभिनव पद्धतीने साजरा

असे होते कार्यक्रमाचे स्वरुप :

आमदार लव्हेकर यांनी एस.व्ही. रोडवरील दिल्ली दरबार हॉटेलसमोरील मैदानात या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्यामध्ये त्यांनी प्रति अयोध्याची प्रतिकृती उभारली होती. तसेच सुंदर पाठ आणि श्रीराम नामाचे पठण, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, श्री. सत्यनारायण महापूजा व होम हवन, भाविकांसाठी महाभांडारा व भजनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सगळ्या कार्यक्रमाचा भाविकांनी सकाळपासूनच लाभ घेतला. वर्सोव्यातील विविध जाती धर्माच्या नागरिकांनी येथे गर्दी केली होती आणि सुमारे 20 हजार भाविकांनी महाभंडाराचा लाभ घेतला.

या कार्यक्रमस्थळी मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी भेट देऊन महाआरती केली आणि रामनामाचा जयघोष केला. आमदार आशिष शेलार यावेळी म्हणाले की, ज्या प्रकारे आमदार लव्हेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखली आहे व भाविकांना आनंद देण्याचा त्यांचा प्रयत्न वाखणण्याजोगा आहे. वर्सोव्यात अयोध्येच्या श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकरल्याबद्धल आणि येथील वातावरण राममय केल्याबद्दल  त्यांनी आमदार लव्हेकर यांचे भरभरून कौतुक केले.

अहमदनगरच्या गोविंददेव गिरी महाराजांनी करवून घेतला PM मोदींकडून ’11 दिवसांचा’ उपवास…

यावेळी आमदार डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या की, ज्या राम भक्तांना हा सोहळा अनुभवायचा आहे, मात्र तिथपर्यंत पोहचता येणार नाही अशा वर्सोवाकरांसाठी आम्ही येथे अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आणि प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येथील राम भक्तांना दाखवले. तर सकाळी अंध भजन मंडळीने सुमारे दीड तास भजन साकारून श्रीरामाचा येथे जयघोष केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube