‘मी’ शब्द टाकला अन् शिवसेनेला मुंबई महापालिका मिळाली; CM शिंदेंनी उलगडला 2019 मधील घटनाक्रम

‘मी’ शब्द टाकला अन् शिवसेनेला मुंबई महापालिका मिळाली; CM शिंदेंनी उलगडला 2019 मधील घटनाक्रम

मुंबई : मुंबई महापालिकेत 2019 मध्ये भाजपचा महापौर करण्याची तयारी झाली असताना केवळ माझ्या शब्दाखातर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली, असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने कोल्हापूरमध्ये आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. (Cm Eknath Shinde told about 2019 Bmc mayor Election on BJP vs Shivsena)

यावेळी ते म्हणाले, 2019 मध्ये भाजपने मुंबई महापालिकेत महापौर करण्याची तयारी केली होती. पण केवळ माझ्या शब्दाखातर फडणवीस यांनी त्या निवडणुकीतून माघार घेतली. निवडणूक बिनविरोध करून शिवसेनेला संधी दिली. याबाबत फडणवीस काही बोलत नाहीत, हे त्यांचे मोठेपण आहे. मला तोंड उघडायला लावू नका, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

“मतदारसंघात चर्चा करुन निर्णय घेतलाय” : अजितदादांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी सरोज आहिरेंची भूमिका स्पष्ट

2017  मध्ये भाजपची माघार :

2017 मध्ये पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार लढाई झाली होती. यात शिवसेनेच्या 84 तर भाजपच्या 82 जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे महापौर नेमका कोणाचा होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र अचानक भाजपने महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर राज्य सरकारचे स्थैर्य टिकविण्यासाठी भाजपने माघार घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर 4 अपक्षांचा आणि मनसेच्या 6  नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्याने शिवसेनेचे संख्याबळ 94 झाले होते. या जोरावर शिवसेनेचा महापौर निवडून आला होता.

कृषीमंत्री होताच धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी; वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

2019 मध्येही भाजपने घेतली होती माघार :

पुढे 2019 मध्ये राज्यातील सत्तास्थापनेवरुन भाजप-शिवसेननेची फाटाफूट झाली होती. त्यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढविण्यासाठी भाजप महापौर पदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यावेळीही भाजपने अचानक माघार घेतली होती. 2017 प्रमाणे 2019 मध्येही पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे आम्ही महापौर पदासाठी आमचा उमेदवार उभा करणार नाही, असे मुंबई महानगरपालिकेचे तत्कालिन गटनेते खासदार मनोज कोटक यांनी सांगितले होते. दरम्यान, आता भाजपने केवळ माझ्या शब्दाखातर माघार घेतली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube