मुंबईच्या प्रश्नांवरुन विधानसभेत खडाजंगी; साटम अन् वर्षा गायकवाड भिडले
Varsha Gaikwad News : राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता विधानसभेचं कामकाज नियमितपणे सुरु करण्यात आलं आहे. विधानसभेत आज मुंबईच्या प्रश्नांवरुन आज काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील पाणीवाटपावरुन प्रश्न उपस्थित केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी थेट पंतप्रधान मोदी यांचं नाव घेत निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईतील जमिनी हस्तांतरीत होत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे. मुंबईतील घाटकोपर, कुर्ला, बांद्रा परिसरातील अनेक जमिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मित्रालाच दिल्या जात असल्याचं वर्षा गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र उद्योजक गौतम अदानी यांना मुंबईतील जमिनी देत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी यावेळी केला आहे. मागील दीड वर्षांत भाजपच्या लोकांकडून अनेक जमिनी देण्यात आल्या असल्याचंही गायकवाड म्हणाल्या आहेत.
फडणवीस आणि माझ्यात भांडण लावू नका.. तसे होणार नाही : CM शिंदेंनी विरोधकांना ठणकावले
विधानसभेच्या सभागृहात यावेळी बोलताना वर्षा गायकवाड यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतल्यानंतर भाजप आमदारांकडून आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांच्यासह इतर आमदारांनी जोरदार हल्लाबोल चढवत आमदार वर्षा गायकवाड यांना धारेवर धरलं आहे.
यावेळी हल्लाबोल करताना भाजपचे आमदार अमित साटम यांनी थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं नाव घेत निशाणा साधला आहे. या सभागृहात मुंबईच्या प्रश्नावर चर्चा सुरु असताना आमदार वर्षा गायकवाडांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव का घेतलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इकडे काय संबंध आहे? राहुल गांधी कुठे तमाशा करतात सांगू का? राहुल गांधी कुठे मस्ती करतो मीही सांगू शकतो, असं म्हणत
पंतप्रधानांचं नाव घेताच भाजप आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.