आपला विजय होईल असे समजून… : 2024 ची भीती सांगत फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला
मुंबई : आगामी 2024 च्या निवडणुकीत आपलाच विजय पक्का आहे, असे समजून प्रयत्न करणे सोडू नका, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत फडणवीसांनी उपस्थितांन मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी पक्षाच्या नेत्यांना संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने राहण्याच्याही सूचना केल्या. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis advised office-bearers at the state meeting of the Bharatiya Janata Party)
यावेळी फडणवीस म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे वाद आणि मतप्रदर्शन करू नका. वरिष्ठ नेत्यांकडे भूमिका मांडून सामोपचाराने वाद मिटवा. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन आजिबात करू नका, साधेपणाने राहा. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यादृष्टीने तयारी करण्याची आता गरज आहे. महिला, शेतकरी, गरीब आणि युवकांवर जास्त लक्ष केंद्रीत करा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
Raj Kumar Hirani : डंकी चालला, मुन्नाभाई 3 येणार का? दिग्दर्शक हिरानींनी दिली मोठी हिंट
कोणाला तिकीट मिळेल याची चिंता करु नका :
येत्या निवडणुकांमध्ये आपलाच विजय पक्का आहे, असे समजून प्रयत्न करणे सोडू नका. पक्षाचे काम शेवटच्या घटाकापर्यंत पोहचवणे सुरु ठेवा. नवीन कार्यकर्ते जोडा, शिवाय या निवडणुकांमध्ये कोणाला तिकीट मिळेल, कोणाला नाही याची चिंता करु नका. तिकीट वाटपाचा निर्णय भाजपमध्ये संसदीय बोर्ड करत असते, असेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.