‘यांना’ पगारच माझ्यावर आरोप करण्यासाठी मिळतो, हा कचरा…आदित्य ठाकरेंचे नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर

  • Written By: Published:
‘यांना’ पगारच माझ्यावर आरोप करण्यासाठी मिळतो, हा कचरा…आदित्य ठाकरेंचे नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर

Aaditya Thackeray On Narayan Rane : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते (उबाठा) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विरोधकांकडून घेरले जात आहे. मंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केलाय. दिशा सालियन हिचा मृत्यू झाल्यानंतर काहीच वेळात उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नका, अशी विनंती त्यांनी केली होती, असा दावा नारायण राणे यांनी केलाय. त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पोलिसांकडून जप्त; देशातच असल्यावर शिक्कामोर्तब

आदित्य ठाकरे म्हणाले, गेली 16 वर्षे या कचऱ्याला कधी मी उत्तर दिलेले नाही. माझे तेच काम आहे की यांना उत्तर द्यायचे नाही. यांना पगाराच माझ्यावर घाण आरोप करायला मिळतो. माझ्या परिवारावर, वडिलांवर, पक्षावर ते आरोप करतात. त्यांनी आमचा पक्ष वीस वर्षांपूर्वी सोडला असला तरी त्यांच्या मनातून आम्ही जात नाही. त्यांना बोलत राहू दे. आज मी मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिले आहे. सगळ्याच पक्षाच्या मुंबईतील आमदारांनी मुंबईतील रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशी मागितली आहे. 15 जानेवारी 2023 मध्ये मी पत्रकार परिषद घेऊन जो घोटाळा उघडकीस आणला होता. त्याच घोटाळ्याचा उल्लेख काल झालेला आहे. भाजपचे आमदार असो की आमचे आमदार असो. या प्रकरणात आम्ही आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी मागितली आहे. तेव्हा गद्दार मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात हा घोटाळा झालेला आहे. सत्ताधारी पक्ष रस्त्याची चौकशी मागत आहे. मुख्यमंत्री आता रस्त्याच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी लावतील, असा विश्वास ठाकरे यांनी बोलून दाखविला आहे.

Video : परब अन् आक्रमकता?; भर पत्रकार परिषदेत राणेंनी हातवारे करत उडवली खिल्ली


नारायण राणे काय म्हणाले?

सालियन कुटुंबाला प्रशासन, पोलीस, सहकार्य करीत नव्हते. दबाव कमी झाल्यावर सरकारकडे न जाता ते न्यायालयात गेले. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांचा करिता करविता वाझे आहे. सालियन कुटुंबावर त्यावेळी दबाव होतो. न्यायालय जो निर्णय देईल तो देईल. परंतु, तोपर्यंत सरकारणे एफआयआर दाखल करून अटक करायला हवी असं म्हणत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. उद्धव टाकरे यांच्या किती फेऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे किती फेऱ्या झाल्या असा टोलही नारायण राणे यांनी लगावला आहे. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच नाव घेऊ नका अशी विनंती करणारा कॉल आला होता. दुसरा फोन कोरोनाच्या काळात आला होता. त्यावेळी आपल्या हॉस्पिटलची परवानगी राज्य सरकारकडे होती. त्या संबंधित ती परवानगी मिळेल असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी आदित्यचं नाव घेऊ नका अशी पुन्हा एकदा त्यांनी विनंती केली. तुम्ही जरा या प्रकरणात सहकार्य करा असंही ते आपल्याला म्हणाल्याचं राणे यांनी यावेळी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube