डोंबिवलीत ट्विस्ट! निष्ठावंत शिवसैनिकाचा भाजपला पाठिंबा; ठाकरेंच्या अडचणी वाढणार

डोंबिवलीत ट्विस्ट! निष्ठावंत शिवसैनिकाचा भाजपला पाठिंबा; ठाकरेंच्या अडचणी वाढणार

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत आज प्रचाराचा (Maharashtra Elections) शेवटचा दिवस आहे. आज सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आज दिवसभरात स्टार प्रचारकांच्या सांगता सभा होणार आहेत. मात्र याआधीच ठाकरे गटाला जोरदार धक्का देणारी बातमी आली आहे. डोंबिवली जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांना (Ravindra Chavan) समर्थन देणारं पत्र सोशल मिडियावर शेअर केलं आहे.

..म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाहीच; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

डोंबिवली मतदारसंघात ठाकरे गटाने शिंदे गटाचे दीपेश म्हात्रे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज होऊन सदानंद थरवळ यांनी जिल्हाप्रमुख आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून आयत्या वेळी पक्षात येणाऱ्यांना जर तिकीटं दिली जात असतील तर निष्ठावंत शिवसैनिकांनी काय करायचं असा सवाल उपस्थित करत त्यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता.

यानंतर आता थरवळ यांनी मोठा निर्णय घेत थेट भाजप उमेदवाराला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

डोंबिवलीकरांची साथ.. पुन्हा विजयाचा निर्धार; रवींद्र चव्हाणांना पक्का विश्वास

डोंबिवली एक सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मी पाहिलेल्या गेल्या पाच दशकांत डोंबिवलीकरांनी नेहमीच वैचारिकष्ट्या भाजप शिवसेना युतीला साथ दिली. या युतीचा भाग असलेल्या शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आम्हांस भाजप आणि आरएसएस बरोबर जवळून काम करण्याची संधी मिळाली. महापालिकेच्या आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेक विकासकामेही करता आली.

या निवडणुकीत डोंबिवलीची सांस्कृतिक प्रतिमा जपणारा आणि विकासासाठी निधी आणू शकणाराच उमेदवार जनता निवडून देईल. जो उमेदवार स्वतःच्या विचारधारेशी एकनिष्ठ असतो तोच जनतेशी प्रामाणिक राहू शकतो आणि सोयीनुसार तीन चार वेळा विचारधारा बदलणारे सदैव स्वार्थातच मश्गुल असतात. त्यामुळे डोंबिवलीत सध्या उमेदवारांपैकी रवींद्र चव्हाण यांनाच निवडून देणे डोंबिवलीच्या विकासाच्या दृष्टीने आधिक हितावह आहे, असे सदानंद थरवळ यांनी या पत्रात म्हटले आहे.

पोहरादेवीच्या महंतांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र

दरम्यान, याआधी पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. निवडणूक अगदी जवळ आलेली असताना सुनील महाराज यांनी घेतलेला हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. सुनील महाराज ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube