‘मला अदानींची बाजू घ्यायची नाही’; चौफेर टिकेनंतर रोहित पवार बोलले

  • Written By: Published:
‘मला अदानींची बाजू घ्यायची नाही’; चौफेर टिकेनंतर रोहित पवार बोलले

मुंबई : काँग्रेससह विरोधकांनी हिंडेनबर्गच्या रिपोर्टवरुन (Hindenburg Report) अदानी आणि मोदी सरकारला टार्गेट केलं आहे. परंतु, दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी (Nationalist MLA Rohit Pawar) मात्र अप्रत्यक्षपणे अदानींचं समर्थन केल्यानं रोहित पवार टीकेचे धनी झाले झाले होते. दरम्यान, आता चौफेर टीका झाल्यानंतर रोहित पवारांनी फेसबूकवर आपली भूमिका स्पष्ट केली.

काही दिवसांपूर्वी, ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहावर फसवे व्यवहार केल्याचे आरोप केले. त्यामुळं सर्व विरोधक अदानींवर झालेल्या आरोपांवर सरकारला प्रश्न विचारात आहेत. संसदेतही अदानींवरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार भाषण करत सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या मुद्द्यावर सगळे विरोधी पक्ष एकत्र आहेत असे चित्र निर्माण होत असताना रोहित पवारांनी अदानींचं अप्रत्यक्षपणे समर्थन करुन बिब्बा घातला. रोहित पवार यांनी एका मुलाखतीत अदानींचे समर्थन केले.

Nana Patole : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याचा पटोलेंना नाही पत्ता; पहा, काय म्हटलेय त्यांनी ? 

ते म्हणाले की, हिंडेंनबर्गसारखी कंपनी ही अशा मोठ्या उद्योगांविरोधात अहवाल तयार करून त्यांचे समभाग घसरतील असा कट आखते. त्यांचा हाच धंदा आहे. त्यातून या कंपनीला फायदा मिळवता येतो. सध्या भारतात रिलायन्सच्या माध्यमातून सर्वाधिक रोजगार उपलब्ध होत आहेत. त्याखालोखाल टाटा, अदानी यांच्या उद्योगातून रोजगार उपलब्ध होत आहेत. त्यांच्याकडे मी युवकांना नोकऱ्या किती देऊ शकतात, यादृष्टीने मी पाहतो. सरकारी नोकऱ्यांनंतर हे खासगी उद्योग मोठ्या प्रमाणात रोजगार देतात.

https://www.youtube.com/watch?v=gXMghA2XkpQ

दरम्यान, हिंडेंनबर्गसारख्या कंपनीवर कटाचा आरोप केल्यानंतर रोहित पवारांवर टीकेचे झोड उठली. त्यानंतर रोहित पवारांनी एक फेसबुक लिहिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, आज काहीजण माझे जुने फोटो ट्विट करत असले तरी मीच यापूर्वीच ते ट्विट केलेले आहेत. त्यात नवीन काही नाही. शिवाय मी युवांचा प्रतिनिधी म्हणून युवांप्रमाणे थेट भूमिका घेणारा कार्यकर्ता असून मला अदानी किंवा हिंडेनबर्ग या कोणाचीही बाजू घ्यायची नसल्याचं सांगितलं.

काही गडबड असेल तर JPC मार्फत जरूर चौकशी व्हावी. मात्र, परंतु देशातील लाखो युवा आज नोकऱ्या मागत आहेत. भाजपने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दरवर्षी २ कोटी रोजगार तर मिळाले नाहीच. पण आज आहे त्या नोकऱ्या टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत कोणतीही कंपनी अडचणीत येऊन लोकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ नये, असं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.

तसंच लोकांचा घामाचा पैसाही बुडू नये या मताचा मी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं राजकारण न करता एसबीआय, एलआयसी यांसारख्या संस्था अडचणीत येणार नाहीत याची सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे, असं ते म्हणाले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube