‘शिवतीर्था’वर ‘इंडिया आघाडी’ची तोफ धडाडणार! ‘हा शिवसेनेसाठी काळा दिवस’ CM शिंदेंची बोचरी टीका
Cm Eknath Shinde On Udhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच काँग्रेसकडून भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं. देशभरानंतर अखेर आज काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Yatra) सांगता होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदान शिवतीर्थावर जाहीर सभेच्या माध्यमातून भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून या सभेवरुन बोचरी टीका करण्यात येत असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या सभेवरुन उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackeray) जोरदार निशाणा साधला. शिवसेनेसाठी हा आजचा काळा दिवस असल्याची बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंचे आदेश, दोघंही तातडीने मुंबईला या! खैरे-दानवेंचा वाद मिटणार की वाढणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेसाठी आजचा काळा दिवस आहे. ज्या शिवतीर्थावरुन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला मार्गदर्शन केलं आहे. आज त्याच शिवतीर्थावर ज्यांनी स्वांतत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली असल्याचीही टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच राहुल गांधी यांनी आधी सावरकरांसमोर डोकं टेकवून नतमस्तक व्हावं, अशीही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
सारा सोबतच्या इंटीमेट सीनबद्दल अभिनेत्याने थेटच सांगितलं; म्हणाला, ‘मला ओढले आणि…’
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली होती. अखेर काल काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली. मुंबईत दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी राज्यातील काँग्रेस नेते उपस्थित होते. त्यानंतर शिवाजी पार्कवर आज यात्रेचा समारोप होणार आहे. त्यासाठी शिवाजी पार्कवर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची ही पहिलीच सभा पार पडणार आहे. या सभेसाठी काँग्रेस नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. आंबेडकरांनीही हे निमंत्रण स्विकारलं असल्याचं समोर आलं असून आंबडेकरही या सभेसाठी उपस्थित राहणार आहे.
या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडीचा लोकसभेच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पहिलीच जाहीर सभा पार पडणार असल्याने या सभेतून विरोधक नेते काय बोलणार? याककडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. याआधी शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून शिवाजी पार्कला ओळखलं जात होतं. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच काँग्रेस नेते बोलणार आहेत. त्यावरुनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.