Eknath Shinde MLA disqualification महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने एका महिन्यापूर्वी निकाल दिला होता. त्यात सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर कोर्टाने आपली निरीक्षणे नोंदवली होती. राज्यपालांचे(Governor)सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले होतं. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे पाठवून त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने सांगितलं. मात्र,अद्याप यावर निर्णय झाला नाही. […]
Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकारण आता ढवळून निघत आहे. या मतदारसंघातील प्रलंबित असलेला एमआयडीसीचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी थेट विधानसभेत नेत पवार-शिंदे राजकीय वादाला वेगळीच धार दिली. मतदारसंघात एमआयडीसी होत नाही त्यामागे राम शिंदेच आहेत असा आरोप करत शिंदे यांना इगो आहे त्यांना इतकाच इगो असेल तर निवडणुकीच्या मैदानात या, […]
पुणे : भाजपने टीका करण्यापेक्षा टोल मुक्त महाराष्ट्रची घोषणा दिली होती त्याचं काय झालं, ते सांगावं. महाराष्ट्रातील रस्ते व्यवस्थित नाहीत. खड्डे आहेत, फॅस्टटॅगची मनमानी सुरु आहे. पण त्यापूर्वीच टोल लावला आहे आणि आपण टोल भरतोय. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून सुरु आहे. सध्या मंत्री केंद्रातील मराठी आहे, महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्रातीलच रस्ते खराब आहेत. याच्या […]
CM Ekanath Shinde and Tanaji Sawant : राज्य विधानसभेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गट व अजित पवारांच्या गटाला भरघोस निधी दिला असल्याची माहिती आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी परभणी जिल्ह्याला दिलेला 150 कोटींच्या निधीला शिंदेंनीच स्थगिती दिली आहे. तानाजी सावंत हे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. […]
Ashish Shelar replies Uddhav Thackray : शिवसेना पॉडकास्टच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनीही ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत […]
Uddhav Thackeray criticized PM Modi : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यांनी बंगळुरूच्या बैठकीत INDIA आघाडी स्थापन केली आहे. यानंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने विस्तारण्यास सुरुवात केली. काही पक्षांनी एनडीएत एन्ट्री घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखतीत या एनडीएवर जोरदार प्रहार केला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे […]