ठाकरेंचे विश्वासू आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात; CM शिंदेंच्या उपस्थितीत घेतला प्रवेश
Mumbai News : महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी केली जात असतानाच ठाकरे गटात वाद उफाळून आला. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते यांच्यात धुसफूस सुरू झाली. दोघांतील वाद मिटवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे. विधानपरषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. आपण ठाकरे गट सोडून कुठेच जाणार नाही असे आदल्या दिवसापर्यंत सांगणाऱ्या आमदार पाडवी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार? पवारांनी अखेर सांगूनच टाकलं
नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून आमदार पाडवी ओळखले जातात. शिवसेनेत फूट पडली तेव्हा आमदार पाडवी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. नंदूरबार जिल्ह्यातील ठाकरेंचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. 1995 मध्ये त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. आज आमदार पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह काही नगरसेवकांनीही प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने नंदूरबार जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. यावेळी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.
आगामी लोकसभा निवडणुकीत पाडवी इच्छुक होते. हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाईल अशी शक्यता आहे. परंतु, या मतदारसंघात केसी पाडवी काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे पाडवी यांची मागणी मान्य होणारच नव्हती. त्यामुळे पाडवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार पाडवी अक्कलकुवा येथून कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. स्थानिक नेत्यांनी मात्र पाडवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध केला होता. इतकेच नाही तर या नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पाडवी यांना प्रवेश देऊ नये अशी मागणीही केली होती.
Uddhav Thackeray : माझ्या घराणेशाहीला विरोध केला तसा तटकरेंना करून दाखवा; ठाकरेंचे मोदींना आव्हान