ठाकरेंचा पहिला उमेदवार जाहीर, वरूण सरदेसाई निवडणुकीच्या आखाड्यात, वांद्रे पूर्वमधून लढणार

  • Written By: Published:
ठाकरेंचा पहिला उमेदवार जाहीर, वरूण सरदेसाई निवडणुकीच्या आखाड्यात, वांद्रे पूर्वमधून लढणार

Varun Sardesai : मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी ( Maharashtra Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghdi) उमेदवार ठरला आहे. ही जागा ठाकरेंची शिवसेना (UBT) लढणार असून तिथून युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसा (Varun Sardesai) लढणार असल्याचं निश्चित झालं. त्यांचा सामना आमदार झिशान सिद्दीकी यांच्याशी होणार आहे.

मानकर, ठोंबरेंच्या विरोधाला केराची टोपली; चाकणकरांच्या पाठीशी अजितदादा खंबीर उभे… 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाला मोठ्या प्रमाणात वेग आला. आज आमदार अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलतांना वरून सरदेसाईंच्या उमेदवारीबाबत विधान केलं. आम्ही उद्धवसाहेबांशी चर्चा केली आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघासाठी वरुण सरदेसाई यांचे नाव निश्चित केलंय, असं परब म्हणाले. दरम्यान, अधिकृत घोषणा नंतरच केली जाईल.

वरुण सरदेसाई यांचे लोकसभा निवडणुकीतील आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील काम पाहून पक्षाने त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवल्याचं बोललं जातं.

जागावाटपावरून मविआत धुसफूस, अखिलेश यादवांचा राज्यातील 12 जागांवर डोळा… 

दरम्यान, झिशान सिद्दीकी हे सध्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला होता. ते पुन्हा वांद्रेतून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळं वांद्रेमध्ये झिशान सिद्दीकी आणि वरून सरदेसाई यांच्यात लढत होणार आहे.

कोण आहेत वरूण सरदेसाई?
वरून सरदेसाई हे ठाकरे घराण्याचे विश्वासू मानले जातात. ते आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. सध्या ते युवासेनेत कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला. नुकतीच झालेली मुंबई विद्यापीठातील सिनेटची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वाखाली जिंकली गेली होती. शिवाय आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात देखील वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता. तेव्हापासून त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती. अखेर आज त्यांचा मतदारसंघही निश्चित झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube