जागावाटपावरून मविआत धुसफूस, अखिलेश यादवांचा राज्यातील 12 जागांवर डोळा…
Maharashtra vidhansabha election : विधानसभेची (Vidhansabha Election) आचारसंहिता जाहीर झाली, त्यानंतर आता महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपांच्या बैठक होत आहे. आता समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य केलं. आम्ही महाराष्ट्रात इंडिया आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे, असं विधान त्यांनी केलं.
Made Fore More…महिलांचा उत्सव! शर्वरी झाली मिराजियोच्या नवीन कलेक्शनची मॉडेल
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना इंडिया आघाडी जोरदारपणे काम करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, मी उद्या महाराष्ट्रात जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. राज्यात आमचे दोन आमदार आहेत. आम्हाला आशा आहे की, यावेळी जास्त जागा मिळतील. आम्ही पूर्ण ताकदीने इंडिया आघाडीसोबत उभे राहू.
रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल; प्रवासाच्या ‘इतके’ दिवस आधी करता येईल बुकिंग
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार आहेत. त्यापैकी अबू आझमी हे शिवाजी नगरचे तर रईस शेख हे भिवंडीचे आमदार आहेत.
यंदा सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा आहे. यामध्ये मुस्लिम आणि यूपीचे लोक मोठ्या संख्येने राहतात अशा ठिकाणांचा समावेश आहे. मात्र, महाविकास विकास आघाडीत सपाला 3-4 जागा मिळू शकतात, अशी चर्चा आहे.
अबू आझमींचा मविआला इशारा…
महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्या आघाडीत समाजवादी पक्षाचा अपमान करू नये. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र समाजवादी पक्षाला एकाच बैठकीत बोलावण्यात आले आणि केवळ १५ मिनिटे चर्चा झाली. समाजवादी पक्ष हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, त्याला हलक्यात घेऊ नये, जर समाजवादी पार्टीला विश्वासात घेतले नाही आणि योग्य वाटा दिला नाही तर स्वबळावर लढू, असा इशारा आझमींनी दिला.
शेकापचा 20 जागांवर दावा…
काँग्रेसवर नाराज असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीची चिंता वाढवली आहे. आपल्या पारंपरिक 20 आपल्याला सोडण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकरी कामगार पक्षाने साक्री, मालेगाव यातील जागांसह शिंदखेडा, धुळे ग्रामीण, बागलाण, नवापूरमधील जागा मागितल्या आहेत. लोकसभेला या जागांवर आम्हाला जास्त फायदा झाला आहे. त्यातील काही मतदारसंघ आम्हाला मिळावेत, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, राज्यात काँग्रेस 119, ठाकरे गट 86, शरद पवार गट 75 जागांवर लढण्याची शक्यता आहे.