Mumbai Crime : मृतदेहाची विल्हेवाट ते अश्लील व्हिडिओ; मनोज सानेची सर्च हिस्ट्री आली समोर
Mira Road Murder Case : मुंबईतील मीरा रोड भागातील देशाला हादरुन सोडणाऱ्या सरस्वती वैद्य हत्याकांडात नवीन खुलासे समोर येत आहेत. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु असून या चौकशीदरम्यान, आरोपीकडून वारंवार आपला जबाब बदलत असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणात मनोज सानेने हत्या केल्यानंतर सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली? त्यासाठी त्याने काय केलं? मनोज त्याच्या मोबाईलवर काय सर्च करीत असत, यासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोजने मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये, म्हणून घरी निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या आणून ठेवल्या होत्या. हत्येआधी मनोज मोबाईलमध्ये नेहमी अश्लील व्हिडिओ पाहत होता. यासंदर्भातील एका चिठ्ठीत त्याने अश्लील वेबसाईटची नावे लिहुन ठेवली होती. हत्येनंतर पोलिसांनी या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या असून आरोपी मनोजची दररोज कसून चौकशी केली जात आहे. मात्र, प्रत्येक चौकशीत मनोज आपला जबाब बदलत आहे.
22 जानेवारी रोजी अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला; मोदींना पूजेसाठी खास निमंत्रण
सरस्वतीच्या हत्येनंतर सरस्वतीच्या तिन्ही बहीणींनी पोलिस ठाण्यात हजेरी लावत आरोपीवर कडक शासन करण्याची मागणी केलीय. याचवेळी पोलिसांनी सरस्वतीच्या मृतदेहासंबंधित घरातील फोटोंचे दाखवण्यात आले. आरोपी मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिचे केस किचनमध्ये ठेवले होते. सरस्वतीच्या लांबलचक केसांचे फोटो पाहुन बहीणीने टाहो फोडला आहे.
बहीणीने टाहो फोडत सरस्वतीचं तिच्या केसांवर अधिक प्रेम होतं, असं सरस्वतीची बहीण पोलिसांना सांगत होती. मनोजने सरस्वती वैद्यची हत्या केल्यानंतर तिच्या डोक्यावरचे केसही कापले. मनोजला सरस्वतीचे केस आवडत असतं त्यामुळे तिने लांब केस वाढवले होते. सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोजने तिचे केस कापून ओट्यावर लटकवले होते.
तसंच मृतदेहाचे फोटो काढले. हे फोटो मनोजच्या मोबाईलमध्ये होते. ते पाहिल्यानंतर सरस्वतीच्या बहिणी खूपच भावूक झाल्या आणि त्यांना रडू कोसळलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच सरस्वतीच्या मृतदेहाची दुर्गंधी पसरू नये म्हणून मनोज सानेने पाच बाटल्या निलगिरी तेल आणलं होतं असंही पोलिसांनी सांगितलं.
आइसलँड-रशियामध्ये शीतयुद्ध, आइसलँडने घेतला मॉस्कोमधील दूतावास बंद करण्याचा निर्णय
चौकशीदरम्यान पोलिसांनी मनोजचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये मनोज नेहमी अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचं समोर आलं. त्यासाठी त्याने एका कागदावर काही अश्लील वेबसाईटही लिहुन ठेवल्या होत्या. मनोजची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून मनोज वारंवार आपला जबाब बदलत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
दरम्यान, सरस्वतीला तीन बहिणी आहेत हे पोलिसांना अनाथ आश्रमातून समजलं होतं. ते त्यांना शोधणार होते मात्र त्याच पोलीस ठाण्यात आल्या. त्यांचे डीएनए नमुने आता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.