Video : बॉलिवूड गायक शान राहत असलेल्या इमारतीला भीषण आग; रहिवाशांची पळापळ

Video : बॉलिवूड गायक शान राहत असलेल्या इमारतीला भीषण आग; रहिवाशांची पळापळ

Mumbai News : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान याच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. या आगीत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आता आग आटोक्यात आणण्यात आली असून विद्युत शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे. वांद्रे पश्चिम येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या ७ व्या मजल्यावर आग लागली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दलाच्या जवानांनी इमारतीमधील अनेकांची सुखरुप सुटका केली. त्यांना इमारतीबाहेर काढलं. एका वृद्ध महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात नेण्यात आलं. यानंतरही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर बराच वेळाने आग आटोक्यात आणण्यात आली.

2024 मध्ये आव्हानात्मक भूमिका, बॅक टू बॅक हिंदी प्रोजेक्ट्स ; सईची बॉलिवूडला पडलेली भुरळ

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासणीतून समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली होती की यामागे अन्य काही कारणे आहेत याची माहिती समोर येणार आहे. इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. यावेळी गायक शान देखील इमारतीबाहेर उभा होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube