सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होताच भावेश भिंडेची धूम; कुटुंबियासह फरार

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होताच भावेश भिंडेची धूम; कुटुंबियासह फरार

Mumbai News : मुंबईतील घाटकोपर परिसरात अवकाळी पावसामुळे आलेल्या वादळाने होर्डिंग (Ghatkopar Hording Accident) कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या दुर्देवी घटनेतील आरोपी भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) फरार झाल्याची माहिती समोर आलीयं. या दुर्घटनेत आपलं नाव समोर येताच भिंडे याने आपल्या कुटुंबियांसह धूम ठोकलीयं. पोलिसांकडून भिंडे याचा शोध सुरु आहे.

TVS चा भारतीय बाजारात धमाका, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, किंमत आहे फक्त …

मुंबईच्या घाटकोपरमध्ये पंतनगर भागात असलेल्या पेट्रोल पंपावर वादळी वाऱ्यामुळे जाहीरातीचा मोठा होर्डिंग अचानक कोसळला. हा होर्डिंग अचानकपणे कोसळल्याने पेट्रोल पंप परिसरात असलेले नागरिक या बोर्डखाली अडकून पडले होते. त्यातील 14 जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरु आहेत. भावेश भिंडे हा इगो मीडियाचा संचालक असून याच मीडिया कंपनीचं हे होर्डिंग होतं. यामुळे त्याच्यासह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी : भीमा कोरेगाव प्रकरणात गौतम नवलखा यांना ‘सर्वोच्च’ दिलासा; पण भरावे लागणार 20 लाख

मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बेकायदा होर्डिंग काढण्यासंबंधीची नोटीस बजावली होती. कंपनीने आपले 8 बेकायदा होर्डिंग पुढील 10 दिवसांत काढले नाही तर कंपनीचा शहरातील 24 वॉर्डात होर्डिंग लावण्याचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा महापालिकेने या प्रकरणी दिला होता. पण कंपनीने त्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. ज्या जमिनीवर हे होर्डिंग होतं ती जमीन गृह खातं आणि महाराष्ट्रा राज्य पोलीस हाऊसिंग वेल्फेअर कॉर्परेशनच्या मालकीची आहे.

BMC च्या निवेदनानुसार पंत नगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग हे अनधिकृत होते. यासाठी महापालिकेने परवानगी दिली नव्हती. घाटकोपरमध्ये पडलेले हे होर्डिंग लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये सर्वात मोठे होर्डिंग म्हणून नोंदले गेले आहे, ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे 1583 चौरस मीटर आहे. भाजप आमदार राम कदम यांनी भावेश भिंडे याचा उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध जोडला आहे. त्यांनी भावेश भिंडे व उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोवरून दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला कुणाचे संरक्षण होते हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले आहेत.आता भावेश भिडे कनेक्शनवरुन राजकारण सुरु झालं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube