Download App

धनंजय मुंडेंच्या रिक्त खात्याचा मंत्री कोण? अजितदादांनी कुणाला दिली खुर्ची; वाचा निर्णय..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच स्वतः या रिक्त असलेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार आपल्या हाती घेतला आहे. 

Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा (Dhananjay Munde) द्यावा लागला होता. त्यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कार्यभार होता. परंतु, त्यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर रिक्त झालेल्या खात्याचा मंत्री कोण होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. नाराज छगन भुजबळ यांना या खात्याचे मंत्री करून त्यांचे पुनर्वसन केले जाणार का असाही प्रश्न होता. माजलगावचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांना संधी मिळणार अशीही चर्चा दबक्या आवाजात होती. परंतु, मंत्रिपदासाठी या दोघांचाही विचार झाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीच स्वतः या खात्याचा कार्यभार आपल्या हाती घेतला आहे.

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. रिक्त खात्याचा कारभार कुणाला द्यायचा असा प्रश्न अजित पवार यांच्यासमोर होता. या चर्चेत राष्ट्रवादीतील दोन ज्येष्ठ आमदारांची नावे समोर आली होती. जहां नहीं चैना वहां नही रहना, असे म्हणणाऱ्या नाराज छगन भुजबळांचे पुनर्वसन होणार की बीड जिल्ह्यातील माजलगावचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांना संधी मिळणार अशी चर्चा आता  सुरू झाली होती.

जहां नहीं चैना वहां नहीं रहना म्हणणाऱ्या भुजबळांना मंत्रिपद? मुंडेंचा राजीनामा पथ्यावर..

अन्न व नागरी पुरवठा या खात्याचा कारभार अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना दिला होता. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं होतं. यात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं होतं. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाला सुरुवातीपासूनच विरोध केला जात होता. तरी देखील मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यानंतर त्यांच्या पालकमंत्रिपदाला विरोध झाला. येथे मात्र सरकारने माघार घेतली. धनंजय मुंडेंना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिलं नाही. अजित पवार यांनी स्वतः बीड जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली होती.

परंतु, आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त झाले होते. या ठिकाणी राष्ट्रवादीच्याच एखाद्या आमदाराची वर्णी लागणार हे निश्चित होते. छगन भुजबळ आणि प्रकाश सोळंके यांचा विचार होऊ शकतो अशी शक्यता होती. मात्र अजित पवार यांनीच हे खातं आपल्याकडे घेतले आहे. आता अजित पवार यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी असणार आहे. अजितदादांकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क, ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा ही तीन खाती असतील. इतकेच नाही तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी त्यांच्याकडेच आहे.

खंडणीसाठी मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली का? CM फडणवीस म्हणाले, हे काम अतिशय

दरम्यान, सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संबंधित प्रश्न विचारले जातील. या प्रश्नांची उत्तरे तातडीने द्यावी लागतील. म्हणून तात्पुरत्या स्वरुपात का होईना पण अजित पवार या खात्याचे मंत्री झाले आहेत. आता अजित पवार यांच्याकडे अधिवेशन काळापुरतेच हे खाते राहणार की कायमस्वरुपी राहणार. अधिवेशनानंतर या खात्याची जबाबदारी कुणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us