मोठी बातमी! नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचं निधन; महिनाभराची झुंज अयशस्वी
Nawab Malik Son In Law Sameer Khan Passes Away : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान यांचं आज निधन झालंय. स्वत: नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिलीय. काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान (Sameer Khan) अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण आज त्यांचा मृत्यू झालाय, खुद्द मलिकांनी याबाबत माहिती दिलीय.
17 सप्टेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास समीर खान यांचा अपघात झाला होता. नवाब मलिक यांची मुलगी आणि निलोफर यांचे ते पती होते. 17 सप्टेंबर रोजी हे दोघे नियमित आरोग्य तपासणीसाठी क्रिटी केअर हॉस्पीटलमध्ये गेले होते. तपासणी करून परतत असताना ते त्यांच्या गाडीची वाट पाहात उभे होते. पण त्यांच्याच ड्रायव्हरकडून समीर खान यांच्या अंगावर गाडी आली, ते गाडीच्या चाकाखाली आले. त्यामुळे त्यांच्या मेंदूला मार लागला होता. त्यांना तातडीने क्रिटी केअर हॉस्पीटलमध्ये दाखल केलं होतं.
‘माझा आव्हाडांना सल्ला, शब्द विचारपूर्वक वापरा..’; ‘पाकिटमार’ वक्तव्यावरून भुजबळांच्या कानपिचक्या
कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी गाडी घेऊन येत असताना त्यांनी पाय गाडीच्या एक्सलेटरवर ठेवला. यामुळे कार थेट समीर खान यांच्या अंगावर गेली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं नवाब मलिकांनी सांगितलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली अन् समीर खान यांचा मृत्यू झालाय.
या अपघातासंदर्भात पोलिसांनी 38 वर्षीय चालक अबुल अन्सारी याला ताब्यात घेतलं होतं. त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे. माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. पुढील दोन दिवसांचे माझे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत, असं नवाब मलिकांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि त्यांची मुलगा सना खान दोघेही रिंगणात उतरले आहे. त्याचपूर्वी जवळचा व्यक्ती गमवाल्यामुळे एेन निवडणुकीत नवाब मलिक आणि सना खान यांच्यावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.