आज विधान परिषदेच्या पदविधर मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं चित्र आहे.
मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी राज्य सरकारने आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीयं.
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.
शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
लोकसभेनंतर अजित पवारांचे अनेक नेते शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छूक असून, ते केवळ निधी वाटपासाठी हे सर्व थांबले असल्याचे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.
महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोली कंगना रनौतने मागितल्यानंतर त्यावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे.