टीम इंडियाने मोठा विजय मळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. काल मुंबईत मोठी रॅली काढण्यात आली. आज विधीमंडळात चार खेळाडूंचा सतक्रा होणार.
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निलंबन केलं होतं.
अनेक ठिकाणी मराठा आरक्षणातील लढ्यात सहभागी झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना त्रास होतो. आता यातील अनेकांनी थेट मंत्री मुंडेंना इशारा दिला आहे.
परळीतील गोळीबार प्रकरणावरून वाल्मिक कराडच नाव घेत आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणात धनंजय मुंडेना लक्ष केलं आहे.