आमदार मुक्ता टिळक यांचे निधन पुणेः पुण्यातील भाजप आमदार मुक्ता शैलेश टिळक यांचे आज निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी सामना करत होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्याचे महापौरपद त्यांनी भूषविले होते. त्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील सुनबाई म्हणून त्यांना मान होता. […]
पुणे : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पुणे पोलीसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता. राज्यात सत्ताबदल होताच रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट देण्यात आली होती. या संदर्भात पुणे पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयात सादर केला होता. परंतु, […]
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धा काही दिवसांपूर्वी वादात सापडली होती. कुस्तीचा आखाडा अहमदनगरमध्ये होणार की पुण्यात यावरुन पैलवानांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावर शरद पवार आणि ब्रिजभूषण सिंह यांनी अखेर तोडगा काढला होता. आता 11 ते 14 जानेवारीदरम्यान पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार 10 […]
नागपूर : नागपूर न्यास जमीन प्रकरणावरून विरोधकांनी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर विधान परिषदेत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. नागपूर न्यास प्रकरणात मी नगरविकास मंत्री अथवा मुख्यमंत्री म्हणून कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ […]
नागपूर : कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा उपस्थित करताना […]
नागपूर : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी श्रध्दा वालकर प्रकरणाची विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करणारी लक्षवेधी विधानसभेत मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशिष शेलार यांची मागणी मान्य करीत विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्याची घोषणा केली. ‘कोणत्याही जाती-धर्माची मुलगी असली तरी सरकारने काळजी केली पाहिजे. श्रध्दा वालकर प्रकरणात […]