भाजपचा कार्यकर्ता असेल तरी कारवाई झाली पाहिजे; बदलापूर अत्याचार घटनेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

भाजपचा कार्यकर्ता असेल तरी कारवाई झाली पाहिजे; बदलापूर अत्याचार घटनेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Badlapur Case :  बदलापूरमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. या घटना देशभरात वारंवार घडतात. ठराविक राज्यातील ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं. (Uddhav Thackeray ) आज संजय राऊत यांना सामनाच्या अग्रलेखातही लिहिलं आहे. एका बाजूने आपण राज्यात लाडकी बहीण योजना आणत असतानाच आपल्या राज्यात या लाडक्या बहिणीच नाही त्यांच्या छोट्या छोट्या मुलीही असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.

मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; SIT होणार स्थापन

देशात कुठेही अशी घटना घडता कमा नये. या घटनेला जबाबदार असलेल्यांविरोधात लवकरात लवकर खटला चालवावा. मग ते फास्ट ट्रॅक कोर्ट असो किंवा इतर माध्यमातून असो अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. तसंच, काही वर्षांपूर्वी निर्भया कांड झालं होतं. आरोपी पकडले, गुन्हे सिद्ध झाले. मग किती वर्षांनी फाशी दिली त्यांना? यासाठी जबाबदार कोण? गुन्ह्यांसाठी गुन्हेगार जबाबदार असतात. तसंच त्याचा न्यायनिवाडा करुन शिक्षेला दिरंगाई करणारेही जबाबदार धरले पाहिजेत. हे जर झालं तरच अशा गोष्टींना आळा बसले असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

अशा घटनांचं राजकारण करता कामा नये. आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन कोरोनामुळे दोन ते तीन दिवसांचं झालं होतं. त्यामुळं. आमचे सरकार गद्दारांनी पाडलं म्हणून आम्ही हे विधेयक आणू शकलो नाही. आता त्यांनी हे विधेयक रखडवलं आहे. हे विधेयक आणून या बलात्काऱ्यांना या शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे, असं म्हणत मी तर असंही ऐकलं आहे की बदलापूरची ती शाळा भाजपच्या कार्यकर्त्यांशी संबंधित आहे असंही ते म्हणाले आहेत.

Video: आता बस्स झालं! यांना चिरडून मारा; बदलापूर अत्याचार प्रकरणावर आमदार शिरसाठ संतप्त

मी यात राजकारण आणत नाही. तसा माझा हेतूही नाही. कोणताही कार्यकर्ता असला अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलंच पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. वरळीतील हिट अँड रन आरोपी मिहीर शाह देखील आता मुक्त आहे. त्यांनी त्याला निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे आता यात भाजपाचे कार्यकर्ते असतील तर निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार आहात का? संपूर्ण जग आता बघत आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube