Badlapur Crime : गृहमंत्री मनसेचा असता तर जागेवर एन्काऊण्टर केला असता; मनसेचा संताप

  • Written By: Published:
Badlapur Crime : गृहमंत्री मनसेचा असता तर जागेवर एन्काऊण्टर केला असता; मनसेचा संताप

मुंबई : बदलापूर शहरातील नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर घटनेनंतर आता या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी जर गृहमंत्री मनसेचा असता तर, जागेवर एन्काऊण्टर केला असता अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Supria Sule MNS Avinash Jadhav On Badlapur Crime)

बदलापूर शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री शिंदे अन् गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले?

तर एन्काऊंटरच होईल, अशी भीती आरोपींच्या मनात बसली  पाहिजे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्या गेल्या अनेक दिवसांपासून घटनेचा पाठपुरावा करत होत्या. जे घडले ते खूपच वाईट होते. असा मानसिकतेच्या लोकांचा एन्काऊंटर झाला पाहिजे. गृह खात्याने यांना ठोकले पाहिजे. एन्काऊंटरच होईल अशी भीती आरोपींच्या मनात बसली पाहिजे म्हणजे लहान मुलींच्या अंगावर हात टाकण्याची कुणाची हिम्मत होणार नाही असे जाधव यांनी म्हटले आहे.

धक्कादायक! शाळेत चिमुरडीवर अत्याचार; अंगावर काटा आणणारी घटना, पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई

नराधामांना एकदा तरी लोकांच्या समोर फाशीची शिक्षा द्या – सुळे

या संतापजनक घटनेनंतर सर्वच स्तरातून भावना व्यक्त केल्या जात असून, चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांना लोकांच्या समोर फाशीची शिक्षा द्या, ही एकदम घाणेरडी विकृती आहे. अशा विकृत लोकांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही असे सुप्रिया सुळेंनी बदलापूरच्या घटनेवर बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुठल्या महिलेकडे पाहताना धडकी भरली पाहिजे, हात लावणं तर दूरची गोष्ट पण पाहताना देखील दहा वेळा विचार केला पाहिजे, असंही सुळेंनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube