…तर मी केंद्रीय मंत्री असते; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? पक्ष फोडण्यावरूनही केलं मोठ वक्तव्य

…तर मी केंद्रीय मंत्री असते; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? पक्ष फोडण्यावरूनही केलं मोठ वक्तव्य

Supriya Sule : महिलांना सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा असतो, (Supriya Sule) मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी केल आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

नेमकं चाललंय तरी काय? पुण्यात भाजपानेच अजितदादांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

एक देश एक निवडणुकीचा नारा देणारे सरकार महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलत आहे. याचा अर्थ सरकार डर रही है, कारण राज्यातील महायुतीचे नेते निष्क्रिय असल्यामुळेच प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्रात यावे लागत आहे, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दोन पक्ष फोडण्याचं देवेंद्र फडवणीस यांना कौतुक वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे. मी पक्षाकडे खासदरकीचे तिकीट सोडून काहीही मागत नव्हते. कारण संसदेत पहिला नंबर येत असल्यामुळे मी मेरिटवर खासदारकीचं तिकिट मागितलं, तर तो गुन्हा आहे का?, असा सवाल सुळेंनी उपसथित केला आहे.

आपली सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हमीभावासंबंधीचा घेईल. आता पुढील 90 दिवस आपल्याला स्वाभिमानासाठी लढायचं आहे. देशातील जनता खोकेवाली नाही, तर इमानदार आणि प्रामाणिक आहे, हे त्यांनी लोकसभा निकालात दाखवून दिले आहे. तर मी कष्टाची परिकाष्टा करेन आणि सत्याच्या मार्गाने चालेन पण कधीही दिल्ली समोर मुजरा करणार नाही, असेही सुळेंनी म्हटलं आहे.

अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी दावा ठोकत वातावरण तापवलं

सध्या न्यायालयात सुरु असलेली लढाई ही फक्त पक्ष आणि चिन्हाची नाही तर ती नैतिकतेची लढाई आहे. कारण पक्ष आणि चिन्ह ओरबाडून घेणं हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा घात केला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर आता अनेकजण माफी मागत आहेत, पण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा मनाने मोठा असतो पण माफी मागणारे स्वतःची चूक मान्य करत असतील ते कोर्टातील केस मागे घेणार का? असा सवालही खासदार सुळे यांनी उपस्थित केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube