- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी
मुंबई : आपल्या स्वतःचं घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. म्हाडाकडून लवकरच 4721 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4721 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात ही सोडत पार पडण्याची शक्यता आहे. म्हाडामध्ये नुकतीच ठाणे, विरारमध्ये नव्या घरांची भर पडली आहे. त्यामुळं लवकरच म्हाडाच्या कोकण विभागाकडून घरांची सोडत होण्याची […]
-
एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पुण्यातील खळबळजनक घटना
पुणे : पुण्यात एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसानीने या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या आत्महत्येतील मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. विषारी द्रव्य प्राशन करून या कुटुंबातील सदस्यांनी […]
-
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख माती विभागातून उपांत्य फेरीत भिडणार
पुणे : महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख यांनी आपापल्या प्रतीस्पर्ध्याना पराभूत करताना महाराष्ट्र केसरीच्या माती गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सिकंदर शेख समोर बाला रफिक शेखचे तर महेंद्र गायकवाड समोर शुभम शिदनाळेचे आव्हान असणार आहे. माती विभागाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी ‘उपमहाराष्ट्र केसरी’ असणारा लातूरच्या शैलेश शेळकेला सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने ५-२ […]
-
हायकोर्टाचा दणका ! बाईक टॅक्सी सरसकट बंद करण्याचे निर्देश
मुंबई : बाईक टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ‘रॅपिडो’ ला आपली बाईक टॅक्सीची सेवा बंद करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कंपनीला पुण्यातील आपली सेवा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाईक टॅक्सीसोबत कपंनीची रिक्षा, डिलिव्हरी या सेवाही विनापरवाना असल्याचं यावेळी स्पष्ट झालं आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून बाईक टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ‘रॅपिडो’ […]
-
दिपक केसरकर आता तरी लक्ष द्या, दीक्षितांचा राजीनामा आलाय
मुंबई : ज्येष्ठ लेखक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांची मराठी भाषा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. दीक्षित यांनी राजीनामा देताना भाषा आणि वित्त विभागाच्या कारभारावर टीका केली आहे. करमणूकप्रधान, उत्सवी पद्धतीच्या उपक्रमांवर उधळपट्टी कशासाठी? अशी विचारणा दीक्षित यांनी केली आहे. भाषा […]
-
नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करा. पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन
पुणे : एमपीएससीने परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या विरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएसी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थी आक्रमक झाले असून आज (ता.13 जानेवारी) सकाळपासूनच चौकात ठाण म्हणून बसले आहेत. आयोगाकडून परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये करण्यात आलेला बदल हा 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर चौकात पोलीस बंदोबस्त […]









