Sharad Pawar : लोकांचा बळी जातोयं अन् सरकार नुसतचं बघतयं; कळवा घटनेवर शरद पवारांचा संताप
Sharad Pawar : कळवा रुग्णालयात लोकांचा बळी चाललायं अन् हे सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात एकाच रात्री 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावर आता शरद पवार सरकारव चांगलेच संतापले आहेत.
Mumbai : तिकीटाचे 6 रुपये परत न करणे महागात; रेल्वे क्लर्कच्या नोकरीवर कायमची गदा
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे जिल्ह्यात एक दुर्देवी घटना घडली. कळवा शासकीय रुग्णालयात जवळपास 18 लोकांचा जीव गेला आहे. या घटनेत कोणाचे वडिल, कोणाची आई तर कोणाच्या बहिणीचा जीव गेला आहे. लोकांचा बळी जात असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.
Sanjay Dutt Accident: संजय दत्तचा शूटिंगदरम्यान अपघात; डोक्याला पडले टाके
सरकारने या घटनेप्रकरणी ठोस पाऊले उचलून कारवाई करण्याची गरज असल्याचंही शरद पवारांनी यावेळी म्हटलंय. ठाणए महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरूवारी दिवसभरात उपचाराअभावी 6 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसांनंतर आणखी 17 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.
नीलम गोऱ्हेंची रोखठोक मुलाखत, लवकरच…
या घटनेवरुन जितेंद्र आव्हाडांनीही संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले, महापालिकेकडून इथल्या डॉक्टरांना राजाश्रय दिला जात आहे, त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. हे लोकं घाबरणारच नसतील तर ते असंच करणार असल्याचं भाकीतही त्यांनी केलं आहे. दरम्यान, महापालिका काहीही कारवाई करणार नसून रुग्णालयातल्या डॉक्टरांचं निलंबनच नाहीतर त्यांना लाथा मारुन हाकलून द्या, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
शरद पवारांना भाजपची ऑफर खरी की खोटी? रोहित पवारांनी सत्य सांगितलं….
या घटनेवर शासकीय रुग्णालयाचे डीन यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले, मृत व्यक्तींमध्ये एक चार वर्षांचा मुलगा होता. त्याने मोठ्या प्रमाणात रॉकेल प्यायलं होतं. त्यामुळे आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. इतर रुग्ण मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. कुणी तीन दिवस तर कुणी चार दिवसांपासून उपचार घेत होते, त्यातील एका रुग्णाच्या डोक्याला मार लागला होता. या अज्ञात रुग्णाचाही मृत्यू झाला.
तसेच अन्य एका रुग्णाच्या मेंदूला ट्रॉमा होता, त्याचाही मृत्यू झाला. दोन रुग्णांची फुफ्फुसं खराब होती. त्या रुग्णांना संसर्ग होऊन मृत्यू झाला. इतर तीन-चार रुग्णांना मल्टी ऑर्डर डिस्फंक्शन झालं होतं. कुणाला हृदयाची समस्या होती, तर कुणाला अनियंत्रित मधूमेह होता. अशा रुग्णांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांना वाचवू शकलो नसल्याचं राकेश बारोट यांनी सांगितलं आहे.