“एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार”, शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान

“एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार”, शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान

Sanjay Shirsat on Eknath Shinde : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Maharashtra Election) यश मिळालं आहे. मात्र मुख्यमंत्रि‍पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे अचानक (Eknath Shinde) त्यांच्या गावी रवाना झाले आहेत. याद्वापरे त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली आहे. या अनपेक्षित घडलेल्या घडामोडीमुळे महायुतीची मुंबईत (Mumbai) होणारी बैठकही लांबणीवर पडली आहे.

एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर किमान गृह खातं तरी द्या अशी त्यांची मागणी आहे. मात्र भाजप यासाठी तयार नाही. त्यामुळे पेच वाढला आहे. अशातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मोठी घडामोड : काळजीवाहू CM एकनाथ शिंदे दरे गावच्या मार्गावर; महायुतीची मुंबईतील बैठकही रद्द

एकनाथ शिंदे गावी गेल्याने मुंबईतील बैठका होणार नाहीत याबाबत विचारले असता शिरसाट म्हणाले, राजकीय पेचप्रसंग आला तर विचारासाठी वेळ हवा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जाण्याला प्राधान्य देतात. ते त्यांच्या दरे या गावी जातात. या गावात फोनही लागत नाही. आरामात विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जातात. पण आज सायंकाळपर्यंत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील. राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहे त्या अनुषंगाने शिंदे नक्कीच मोठा निर्णय घेतील अशा सूचक शब्दांत आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदासंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर काल मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली.

महायुतीची काल होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नेमकी ही बैठकी कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली आहे याबाबत कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. मात्र, दोन दिवसानंतर अमित शाहंचा फोन आल्यानंतर पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावी निघून गेल्यानेच बैठक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ठरल एकदाचं! २ डिसेंबर रोजी शपथविधी; पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

follow us
  • fb
  • instagram
  • youtube