शंकराचार्यांनी सांगितलयं, ‘विश्वासघात’ हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप; ठाकरेंचा शिंदे गटावर रोख

शंकराचार्यांनी सांगितलयं, ‘विश्वासघात’ हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप; ठाकरेंचा शिंदे गटावर रोख

Aaditya Thackeray : विश्वासघात हे हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप असल्याचं खुद्द शंकराचार्यांनीच सांगितल्याचं म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटावर रोख धरलायं. दरम्यान, मुंबईतील कर्जतमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यातून आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवरुन भाजपसह शिंदे गटाला टार्गेट केलंय.

Dharmaveer 2: ‘चला करू तयारी..’ ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

शंकराचार्य अविमुक्तेश्वरनंद यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी राजकारणावर काही बोलत नसल्याचं म्हणत हिंदू धर्मात विश्वासघात हे सर्वांत मोठं पाप असल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं असल्याचं आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलंय. तसेच उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व घरं पेटवणारं नाही तर चूल पेटवणारं असल्याचाही टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावलायं.

आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदेसह गद्दारांनी पाप केलं आहे. त्यांना आपण लोकसभा निवडणुकीला धडा शिकवला आहे, आता विधानसभेलाही धडा शिकवायचा आहे. गद्दारांनी फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली नसून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली असल्याचंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

Siddhant Chaturvedi: अभिनेत्याने तृप्ती डिमरीच्या यशाबद्दल थेटच सांगितले; म्हणाला, ‘ॲनिमल’ सिनेमाच्या पूर्वी…’

सत्ताधाऱ्यांनी लोकसभेला 400 पार संविधान बदलण्यासाठी हवे होते. हे लोकं आता म्हणताहेत की, हा फेक नरेटिव्ह आहे पण हे खरं आहे. भाजपचेच अनेक नेते संविधान बदलण्याची भाषा करीत होते. स्वत: पंकजा मुंडे यांनीही जाहीर सभेत बोलून दाखवलं होतं. मात्र आम्ही आंबेडकरप्रेमी आहोत, भाजपला संविधान बदलण्यापासून आपण रोखलं, असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

केंद्रात आपलं सरकार येऊ शकतं :
अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर केंद्र सरकारचं भवितव्य आधारित आहे. इंडिया आघाडीचे नेते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच मातोश्रीवर भेट दिली. यासोबत अखिलेश यादव यांच्यासारखे नेते इंडिया आघाडीत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर इंडिया आघाडीचे पक्ष 237 जागांवर विजय मिळवलायं, केंद्रात कधीही खेळ होऊ शकतो, आपलं सरकार येवू शकतं, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube