मुख्यमंत्री मिरवणुकीत बनले मंडळाचे कार्यकर्ते, तंदुर वडापाव खात लुटला आनंद
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंबे चैत्र माता नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत तरुणांसोबत वडापाव खाण्याचा आनंद लुटला आहे. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा रथही ओढला जातो. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते.
हवामानाचा मूड आजही बदलणार? हवामान विभागाने सांगितलं…
मिरवणुकीत काही खास कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील अष्टविनायक चौकातील तंदूर वडापावही खाऊन आस्वाद घेतला. एवढंच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खास आग्रह करत त्यांनाही तो खाऊ घातल्याचं दिसून आले.
विखे तुम्हा सगळ्यांना भारी पडतील; जयंत पाटलांचा BJPला इशारा, विखे खळखळून हसले
या मिरवणुकीत टाळ आणि मृदुंग घेतलेले वारकरी, कोळीनृत्यावर ताल धरणारे कोळी बांधव, भरतनाट्यम सादर करणाऱ्या मुलींचा चमू, लेझीम पथक, दाक्षिणात्य वाद्य वाजवणारे कलावंत, कथकली नृत्य सादर करणारे कलाकार, पारंपरिक काठ्या, तलवारी, दानपट्टे याद्वारे चित्तथरारक प्रात्यक्षिके करण्यात आली.
‘मी पंतप्रधान मोदींना विनंती करेन…’, माजी पाकिस्तानी कर्णधार आफ्रिदीचं मोठं विधान
दरम्यान, देवीची वाजत गाजत मिरवणूक काढल्यानंतर देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते देवीची विधीपूर्वक पूजा करण्यात आली आहे.
या मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून मिरवणुकीचा आणि कार्यकर्त्यांसोबत वडापाव खाण्याचा आनंद लुटला आहे.