हातात बांबू घेत आंदोलक पोलिसांच्या मागे; नवी मुंबईत ट्रक चालकांचं आंदोलन पेटलं
Truck Drivers Protest : नवी मुंबईत ट्रक चालकांच्या आंदोलनाला (Truck Drivers Protest) हिंसक वळण लागलं असल्याची माहिती समोर आली आहे. मोटार वाहन नियमात बदल करण्यात आल्याने संतप्त ट्रक चालकांनी नवी मुंबईत आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान, पोलिस-आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली असून संतप्त आंदोलक बांबू घेऊनच पोलिसांच्या मागे लागल्याचं सांगण्यात येत आहे.
हातात बांबू घेत आंदोलक पोलिसांच्या मागे; नवी मुंबईत ट्रक चालकांचं आंदोलन पेटलं#mumbaitruckdriverprotest pic.twitter.com/VLyw8HOpVd
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) January 1, 2024
काही दिवसांपूर्वीच हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून अनेक विधेयकं मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे मोटार वाहन नियम होय. या नियमांमध्ये सरकारने बदल केला आहे. केंद्र सरकारच्या या नव्या धोरणाविरोधात राज्यातील ट्रक चालकांकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलन सुरु असतानाच अचानक हिंसक वळण लागलं आहे.
New Year 2024 : या राशीच्या लोकांसाठी भाग्याचे ठरणार नवीन वर्ष, आर्थिक समस्या होणार दूर
नवी मुंबईतील JNPT मार्गावर ट्रक चालकांचं आंदोलन सुरु असतानाच भर रस्त्यावरच ट्रक आणि डंपर चालकांनी वाहने उभी केली होती. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केल्याने वाहतूक जाम झाली होती. वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्याबाबत पोलिसांकडून आंदोलकांना सांगण्यात आलं होतं, मात्र आंदोलकांनी वाहने बाजूला घेण्यास विरोध केल्याचं पाहायला मिळालं.
सायलेंट व्होटर मोदींच्या मागे, महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील, चंद्रकांत पाटलांचा दावा
याचदरम्यान, पोलिस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून आलं आहे. पोलिस-आंदोलकांमध्ये बाचाबाची सुरु असतानाच काही आंदोलकांनी अचानक दगड फेकण्यास सुरुवात केली. याचवेळी काही आंदोलकांनी हातात बांबू घेत पोलिसांच्या मागे लागल्याचं दिसून आलं आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलनस्थळापासून पळ काढला असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, ट्रकचालक आणि पोलिसांमध्ये झालेल्या बाचाबाचीमध्ये काही पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी पोलिस यंत्रणेकडून दखल घेण्यात आली असून आंदोलकर्त्यांवर कारवाई करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकानूसार अपघातास जबाबदार ट्रकचालकास सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. याच कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देश भारतील सर्वच ट्रक चालक संपावर गेले आहेत. ट्रकचालकांचा आजपासून तीन दिवसांचा संप आहे.
ट्रकचालकांकडून नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला आहे. एनआरआय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतले असून काही ट्रक चालकांना पनवेल सायन महामार्ग रोखला असून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु असून ट्रक चालक नवीन कायद्याला विरोध म्हणून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.