आमदार बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट? पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरु…
Mla Balaji Kinikar : राज्यात मागील काही दिवसांपासून हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर (Mla Balaji Kinikar ) यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आलीयं. किणीकर हत्येचा कट प्रकरणात पोलिसांकडून दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती समोर आलीयं, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती दिली असल्याचं आमदार किणीकर यांनी सांगितलंय.
विराटचं निलंबन की खिशाला भुर्दंड? धक्काबुक्कीचा काय होणार इफेक्ट; नियम काय सांगतो..
मागील दोन वर्षांपासून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेत दोन गट पडल्याने अंतर्गत वादाचा कलह निर्माण झालायं. या वादातूनच आमदार किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. किणीकर यांनी एका व्यक्तीला त्याच्या मुलीच्या आजारपणावेळी मदत केली होती. या व्यक्तीला किणीकर याच्या हत्येच्या कटाची माहिती मिळताच त्यांनी आमदार किणीकर यांना माहिती दिली. किणीकरांना तत्काळ व्यक्तील पोलिस ठाण्यात नेऊन माहिती देण्यास सांगितलं. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलिसांना माहिती दिलीयं.
Satish Wagh Murder Case : पत्नीचं निघाली मास्टरमाईंड, प्रेमप्रकरणातून सुपारी देऊन पतीला संपवलं…
या हत्येचा कटामध्ये एकूण सहा जण असल्याचं सांगितलं जात असून त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करीत आहेत. हत्येच्या कटाचं प्रकरण समोर आल्यानंतर आमदार बालाजी किणीकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीयं. दरम्यान, या प्रकरणानंतर अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
15 दिवसांपासून हत्येचा कट रचलायं…
काही सूत्रांच्या माध्यमातून माझ्या हत्येचा कट रचला गेला, अशी माहिती मला मिळाली होती. ती माहिती घेऊन मी पोलिसांकडे गेलो होतो. त्यावेळी पोलीस या प्रकरणात आधीपासूनच चौकशी करत असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे डॉ. किणीकर यांनी सांगितले आहे. गेल्या 15 दिवसांपासून हा कट रचला जात होता अशी माझी माहिती असल्याचं किणीकरांनी सांगितलंय. मला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि याबाबत मी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण माहिती दिली असल्याचं किणीकरांनी सांगितलंय..