धक्कादायक! गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल

धक्कादायक! गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल

Gautam Gambhir : भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि सध्या टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांना (Gautam Gambhir) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आयएसआयएस काश्मीरकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात गौतम गंभीर यांनी तत्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क करून तक्रार दाखल केली आहे. कुटुंबाच्या सुरक्षिततेची मागणी करण्यात आली आहे.

याआधी गौतम गंभीरने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला होता. भारत या भ्याड हल्लाला सडेतोड उत्तर देईल. या कृत्यासाठी जे लोक जबाबदार असतील त्यांना त्यांच्या या कृत्याची किंमत चुकवावी लागेल असा इशाराही गंभीरने दिला होता. या हल्ल्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर गौतम गंभीरला धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

BCCI ची मोठी कारवाई! गौतम गंभीरच्या निकटवर्तीयाला दाखवला घरचा रस्ता; कारणही धक्कादायक

पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारताच्या निर्णयांनी घाबरला पाकिस्तान

या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावेही मिळाले आहेत. हल्लेखोरांत दोन अतिरेकी पाकिस्तानी असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतीयांत पाकिस्तानविरुद्ध संताप उफाळून आला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सीसीएस बैठकीत पाकिस्तानचं कंबरडं मोडणारे निर्णय घेण्यात आले. यानंतर काही वेळातच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक आयोजित केली. ही बैठक आज होणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा दणका! 5 महत्वाचे निर्णय, फक्त 48 तासांची मुदत 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube