Ahmedabad Plane Crash मध्ये परदेशी नागरिकांसह 169 भारतीयांचा समावेश; पायलटनेही दिला होता संदेश

Ahmedabad Plane Crash मध्ये परदेशी नागरिकांसह 169 भारतीयांचा समावेश; पायलटनेही दिला होता संदेश

169 Indians including foreign nationals were involved in Ahmedabad Plane Crash; Pilot also gave a message : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले असून या विमानात 242 लोक होते अशी माहिती समोर आली आहे. अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) विमानतळाजवळील मेघानीनगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. माहितीनुसार, बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानात 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. तर दुसरीकडे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) देखील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता या विमानामध्ये भारतीयांसह कोणत्या देशाचे किती नागरिक होते याचा आकडा समोर आला आहे.

Ahmedabad Plane Crash : मदत करा, पंतप्रधान मोदींचे निर्देश, अमित शाह गुजरातला रवाना

परदेशी नागरिकांसह 169 भारतीयांचा समावेश –

एअर इंडियाच्या (Ahmedabad Plane Crash) या अपघात ग्रस्त विमानामध्ये असलेल्या 242 लोक, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते.त्यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 तर कॅनडाचा एक नागरिक होता. दरम्यान या अपगा३ता अगोदर या विमानाचे पायलयने MAYDAY चा कऑल केला होता. याचा अर्थ या विमाना मोठा धोका आहे. त्यावर एटीसीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या या अपघातग्रस्त विमानाचे पायलट सुमीत सरभवाल होते. त्यांना 8200 तासांचा विमान उडवण्याचा एलटीसी म्हणून अनुभव आहे. तर त्यांना 1100 तासांचा सह पायलट म्हणून उड्डाणाचा अनुभव आहे. तर सह पायलट म्हणून कुंदर हे काम पाहत होते. यांच्यासह 10 जणांचा क्रु मेंबर होते.

Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे पायलट सुमीत सरभवाल कोण होते?

आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला?

अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) पोलिस कंट्रोल रूमने देखील याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानामध्ये 242 प्रवासी होते. टेकऑफनंतर 15 मिनिटांत लगेच विमान दुर्घटना झाली. ही घटना मेघानीनगर परिसराजवळ घडली आहे. दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले. आतापर्यंत किती प्रवाशांचा मृत्यू झाला, याची आकडा अजून समोर आलेला नाही. परंतु शेकडो प्रवासी अपघातग्रस्त आहेत.

Ahmedabad Plane Crash : अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

अपघात नेमका कसा झाला?

फ्लाइट एआय 171 अहमदाबादहून (Ahmedabad Plane Crash) लंडनला जात होती. अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ दरम्यान कोसळले. बोईंग विमानाने आधी पेट घेतला आणि नंतर कोसळलं. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचं देखील सांगितलं जातंय. विमान अपघातामुळे परिसरातील इमारतींचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube