Madhya Pradesh : पैशाच्या वादातून भावानेच केला भावाचा खून, आधी बेशुद्ध केले, नंतर केले असे क्रूर कृत्य

  • Written By: Published:
Madhya Pradesh : पैशाच्या वादातून भावानेच केला भावाचा खून, आधी बेशुद्ध केले, नंतर केले असे क्रूर कृत्य

Madhya Pradesh : मध्य प्रदेश येथील गुना येथे खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. या वेदनादायक घटनेने सर्वांनाच हादरवले आहे. गोपीकृष्ण सागर धरणाजवळील खड्ड्यात दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण व्यापारी विवेक शर्मा यांचा मृतदेह सापडला आहे. 42 वर्षीय विवेक शर्मा 12 जुलैपासून बेपत्ता होता. नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. झडतीदरम्यान, पोलिसांनी तलावाजवळ मृतदेह ताब्यात घेतला, ज्याचे तुकडे झाले होते. आश्चर्याची बाब म्हणजे ही वेदनादायक घटना घडवून आणणारी व्यक्ती मृत व्यक्तीचा मामेभाऊ आहे. (A brother killed his brother due to a money dispute, first made him unconscious, then committed such a brutal act)

मामाच्या मुलाने आणि मुलीने केला खून

विवेक शर्मा 12 जुलै रोजी आपल्या मामाच्या मुलाकडून 60,000 रुपये वसूल करण्यासाठी घराबाहेर पडला होता. तो SAF कॉलनीत मोहित शर्माच्या बहिणीच्या घरी पोहोचला, तिथे मोहित आणि त्याची बहीण उपस्थित होते. मोहित शर्मा हा एमआर (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) आहे, ज्याने विवेकला चहामध्ये ड्रग्ज मिसळून बेशुद्ध केले. यानंतर विवेकची बेशुद्धावस्थेत हत्या करण्यात आली. हत्येनंतर भाऊ आणि बहिणीने मिळून विवेकच्या मृतदेहाचे कटरने 6 तुकडे केले. यानंतर आरोपी मोहित शर्मा याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गोपीकृष्ण सागर धरणाजवळ 3 खड्डे खोदले.

पोलिसांना गोंधळात टाकण्याचा डाव

पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी आरोपी मोहित शर्मा याने विवेकची मोटारसायकल सिंहवासा तलावाच्या काठावर सोडली होती. कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंहवासा तलावाजवळ पोलिसांना विवेकची मोटारसायकल सापडली. बेपत्ता विवेकच्या मोबाईलवर नातेवाइकांनी अनेकवेळा फोन केला, मात्र फोन बंद होता. नातेवाइकांनी सांगितले की, विवेक आपल्या मामाच्या मुलाला शेवटच्या भेटीसाठी गेला होता, तेव्हापासून विवेक बेपत्ता आहे. कुटुंबीयांच्या सांगण्यावरून पोलिसांनी मोहितची कडक चौकशी केली असता खुनाचे गूढ उलगडले.

पॉलिथिनमध्ये गुंडाळला मृतदेह

48 तासांनंतर पोलिसांना विवेकचा मृतदेह खड्ड्यात पुरलेला आढळला. मृतदेहाचे 6 तुकडे करून पॉलिथीनने बांधून ठेवले होते, डोके धडापासून वेगळे केले होते. अंगठी आणि ब्रेसलेटवरून नातेवाईकांनी मृताची ओळख पटवली. मोहितची बहीण आणि तिचा पती कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय निवासस्थानी राहत होते. याच सरकारी घरात खुनाचा कट रचला गेला. हत्येमागे आणखी काही कारणे आहेत का?, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube