धक्कादायक! एक-दोन नाही तब्बल 15 इंजिनिअर-डॉक्टर महिलांशी बांधली लग्नगाठ मात्र इंग्रजी भाषेमुळे…

धक्कादायक! एक-दोन नाही तब्बल 15 इंजिनिअर-डॉक्टर महिलांशी बांधली लग्नगाठ मात्र इंग्रजी भाषेमुळे…

Karnataka Crime : महिलांच्या फसवणुकीच्या अनेक घटना आपण ऐकतो. मात्र नुकतीच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने 20214 आपण इंजिनिअर-डॉक्टर आहोत. असा बनाव करत आणि फवणुकीच्या उद्देश्याने एक दोन नाही तर तब्बल 15 इंजिनिअर-डॉक्टर असलेल्या महिलांशी विवाह केला आहे. मात्र त्याच्याशी लग्न केलेल्या इंजिनिअर महिलेने त्याची तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला. ( A man Marie 15 women’s by Fraud poses Doctor-Engineer )

मराठवाड्यात पाणीबाणी! जायकवाडी धरणाचं पाणी पिण्यासाठी आरक्षित…

ही घटना कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात उघडकीस आली आहे. तर या व्यक्तीचं नाव महेश केबी असं आहे. तो बेंगलोरच्या बनशंकरी येथील रहिवासी आहे. म्हैसूर शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी टीम बनवलेली होती. तर त्याला तुमकुरूहून ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा अहवाल समोर

काय आहे हे प्रकरण?

ऑनलाईन विवाह नोंदणी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तो महिलांशी संपर्क करायाचा स्वतः कधी इंजिनिअर कधी डॉक्टर असल्याचं सांगायचा. डॉक्टर आहे हे दाखवण्यासाठी त्याने तुमकुरू येथे एक क्लिनिक बनवलेले होते. एक नर्स कामावर ठेवली होती. तसेच तो महिलांना लग्नानंतर क्लिनिकसाठी पैसे हवे असल्याच्या कारणावरून त्रास देखील देत होता. तर तो पैसे न दिल्याने महिलांचे पैसे आणि दागिने घेऊन फारार झाला होता. तो आपल्या या पत्नींना कमीच भेटत होता. त्याचबरोबर त्याने विवाह केलेल्या या महिलांमध्ये जास्तीत जास्त महिला या उच्चशक्षित आणि नोकरदार होत्या.

मात्र त्याच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाच्या अभावामुळे त्याला अनेकींनी नाकारले देखील होते. त्याचबरोबर त्याची हीच खराब इंग्रजीच त्याचे कारनामे समोर आणण्यास कारणीभूत ठरली. कारण त्याच्या इंग्रजी भाषेवरून त्याच्याशी लग्न केलेल्या इंजिनिअर महिलेने त्याची तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला. तिने याचवर्षी आंध्र प्रदेशमध्ये त्याच्याशी विवाह केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube