महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही लाडक्या बहिणींचा जलवा; एनडीए बंपर बहुमताच्या उंबरठ्यावर
बिहार विधानसा निवडणुकांमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. त्याचा थेट फायदा एनडीएला झाल्याचे बघायला मिळाले आहे.
बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करताना दिसली. (Bihar) ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली. आता बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास पुढे आली असून एनडीएला बहुमत मिळतंय. एकहाती सत्ता एनडीएची असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा बघायला मिळाला. 90 विधानसभेवर भाजपा उमेदवार सुरूवातीपासूनच आघाडीवर बघायला मिळाली.
बिहारमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. त्याचा थेट फायदा एनडीएला झाल्याचे बघायला मिळाले. दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित 66.90 टक्के मतदान झाले, जे 2020 च्या तुलनेत 9 टक्के जास्त होते. बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून नंबर दोनचा पक्ष जेडीयू ठरला असून जेडीयूने मुख्यमंत्रिपदाचा दावा केलाय.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेचा फायदा महाराष्ट्रात इतका झाला की, थेट महायुतीला बहुमत मिळाले लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणाले तसे यश मिळाले नसतानाही लाडकी बहिणीमुळे एकहाती सत्ता महायुती सरकारला मिळाली. लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने राज्यातील महिलांना 1500 रूपये दिली.
बिहारमध्ये देखील एनडीएने महिलांसाठी खास योजना आणत प्रत्येक महिलेच्या बॅंक खात्यावर 10 हजार रूपये जमा केले आणि याचाच मोठा फायदा एनडीएला बसला. महिलांनी भरभरून एनडीएला मतदान केले आणि थेट याचा मोठा फायदा झाला. निवडणुकीच्या दोन महिने आधी संवाद मोहीम सुरू झाली. तुमची योजना, तुमचे सरकार, तुमचे मत. तेजस्वीच्या “माझी बहीण” योजना त्या तुलनेत फिकी पडली. 10 हजार रूपये महिलांना देण्यात आल्याने महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले.
