अजितदादा भाजपसोबत मात्र, त्यांना क्लीनचीट दिलेली नाही; शाहंचं घाम फोडणारं विधान
नवी दिल्ली : पहिले एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत येत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केले. शिंदे आणि अजितदादांचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या भीतीमुळे भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परंतु, देशाचे गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) हा आरोप खोडून काढत अजित पवार जरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असले तरी आम्ही त्यांना क्लीनचीट दिलेली नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा अजितदादांसह खटले सुरू असलेल्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रात 42 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावादेखील शाहंनी केला आहे. लोकमत समूहाने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Amit Shah On Ajit Pawar Clean Cheat In Shikhar Bank Issue)
“अकेला देवेंद्र क्या करेगा?” दुसऱ्या निवडणुकीपूर्वीच फडणवीसांनी बदला पूर्ण केला!
दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार बंड करत भाजपसोबत एकत्र आले. या दोन्ही बंडांनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यात शिंदे आणि अजित पवार यांच्यासह भाजपसोबत गेलेले सर्व नेते हे त्यांच्यावर कारवाई होईल. या भीतीने गेल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. त्यात नुकतेच अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चीट देखील देण्यात आल्याने अजितदादा भाजपसोबत गेल्यानेच त्यांना क्लीन चीट देण्यात आल्याचा सूर अनेकांना अळवला.
PM मोदींची नेहरुंवर टीका! शरद पवारांनी चांगल्या कामाचा दाखलाच दिला…
सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांवर खटले प्रलंबित आहेत. अशा स्थितीत अजित पवारांचं भाजपसोबत येणं म्हणजे त्यांना क्लीन चीट देण्यासारखं आहे का? असा प्रश्न शाह यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शाह म्हणाले की, आम्ही कुणालाही क्लीनचीट दिलेली नाही. आम्ही कोणाला क्लीनचीट देऊ शकत नाही. तसेच ज्या नेत्यांवर खटले सुरू आहेत. त्या सर्व प्रकरणांची चौकशी आणि कायदेशीर प्रक्रीया त्या त्या जागी अतिशय योग्य पद्धतीने सुरू असल्याचे शाहंनी स्पष्ट केले.
Pawar Vs Pawar : पक्ष, चिन्हानंतर आता अजितदादांचा डोळा ‘मलईदार’ कार्यालय अन् फंडांवर?
अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सध्या जरी बंड करत भाजपसोबत सत्तेत आले असले तरी, ज्या नेत्यांवर खटले सुरू आहेत त्यांची चौकशी योग्य पद्धतीने सुरू आहे. ज्या नेत्यांवर आरोप केले जात आहे, त्यांची देखील चौकशी केली जात असल्याचे शाह म्हणाले. त्यामुळे जरी शिंदे आणि अजितदादा भाजपसोबत आले म्हणजे खटले सुरू असलेल्या सर्वांना क्लीनचीट दिले, असा याचा अर्थ होत नाही. शाहंच्या या विधानामुळे पवारांच्या आणि बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली तयार झालेल्या शिंदे आणि अजितदादांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.
CM शिंदेंच्या डोक्यात नाशिकसाठी ‘वेगळेच’ नाव; हेमंत गोडसेंचे टेन्शन वाढले?
नव्या चेहऱ्यांना दिली जाणार संधी
आगामी काळात देशात लोकसभेचे आणि महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये विधानसभेचे बिगुल वाजणार आहे. यावर बोलताना शाह म्हणाले की. आगामी लोकसभेत महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 42 हून अधिकच्या जागा भाजप जिंकेल असा विश्वास व्यक्त करत सर्व शक्यता विचारात घेऊनच पक्षाकडून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यात खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना टाळून विधानसभा विधानसभा निवडणुकीत आमदार आणि राज्यमंत्र्यांसह नव्या चेहऱ्यांना तिकीट दिले जाऊन शकते असे शाहंनी सांगितले. त्यामुळे राज्यात कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार कोण डार्क हॉर्स म्हणून समोर येणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.