मोदींवरील विधानामुळे प्रियंका गांधी, केजरीवाल गोत्यात? निवडणूक आयोगाने धाडली नोटीस

  • Written By: Published:
मोदींवरील विधानामुळे प्रियंका गांधी, केजरीवाल गोत्यात? निवडणूक आयोगाने धाडली नोटीस

नवी दिल्ली:आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal), काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना भारत निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस काढली आहे.निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ही नोटीस काढण्यात आली आहे. केजरीवाल आणि प्रियंका गांधी यांना येत्या दोन दिवसांत,गुरुवारपर्यंत नोटीसाला उत्तर द्यायचे आहे.

एका रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विधान केल्याप्रकरणी प्रियंका गांधी यांना नोटीस काढण्यात आली आहे. तर केजरीवाल यांना मोदी यांच्याबाबत समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टप्रकरणी नोटीस काढण्यात आली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या महिन्यात या ठिकाणी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या राज्यातील निवडणुका काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीसाठी महत्त्वाच्या आहेत. केजरीवाल आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोघांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

CM शिंदेंशी चर्चा, वाघ नरमले! पण कीर्तिकर-कदम वाद काय होता? वाचा ‘उत्तर-पश्चिम’ची A टू Z स्टोरी

नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचइल) ही कंपनी उद्योजक मित्राला विकल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला होता. तर प्रियांका गांधी यांनी चुकीचे विधान केल्याचे भाजपने म्हटले आहे. मोदी यांनी आपल्या उद्योजक मित्रासाठी भेल कंपनीचा वापर केला आहे. याकंपनीमधून रोजगार मिळत होता. त्यातून राष्ट्राची प्रगती होत होती. ही कंपनी मोदींनी आपल्या मित्राला का दिली आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी लावला होता.

कर्नाटकमध्ये परिक्षांसाठी ड्रेस-कोड : ओमर अब्दुल्ला, औवेसींचे बरसले; राजकीय वातावरण तापले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर एक सिरिज चालविली होती.त्यात नरेंद्र मोदी यांच्याबाबत आपत्तीजनक टिप्पणी केली आहे. आपच्या सोशल मीडिया हॅण्डववरून असे ट्वीट करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकांसाठी काम करत नाहीत. ते काही उद्योजकांसाठी काम करत असल्याचे आपने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आपचे राष्ट्रीय समन्वयक यांनी भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या सोशल मीडिया पोस्टबाबत खुलासा करावा. याबाबत योग्य वेळेत खुलासा न केल्यास तुमच्याविरोधात निवडणूक आयोग कारवाई करेल, असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube