उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं! आठ जणांनी अल्पवयीन मुलीला जिवंत जाळलं…

उत्तर प्रदेश पुन्हा हादरलं! आठ जणांनी अल्पवयीन मुलीला जिवंत जाळलं…

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश पुन्हा एकदा हादरुन गेलं आहे. अमेठी शहरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच राहत्या घरी जिवंत जाळून ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली असून पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar : सबका साथ सबका विकास या घोषणेप्रमाणं देशाचा विकास; अजितदादांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

नेमकं काय घडलं?
पीडित मुलीचे वडील जितेंद्र कुमार शुक्ला (बुधवारी) बॅंकेत काही कामानिमित्त गेले होतं. त्याचवेळी त्यांचा पुतण्या रजतकुमारने बॅंकेत घराला आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर जितेंद्र कुमार यांनी तत्काळ घराकडे धाव घेतली.

Uddhav Thackeray : मोदींचं स्वागत, त्यांनी आता मनोज जरांगेंना भेटावं; उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं ?

घराकडे पोहोचताच जितेंद्र कुमार यांना आरोपी घराच्या छतावरुन पळून जाताना दिसले. घराला आग लागलेली असतानाच घरात आपली मुलगी असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जितेंद्र कुमार यांची 16 वर्षीय मुलगी आगीमध्ये होरपळत असल्याचं दिसलं.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने ‘या’ तीन संघांना फायदा; टीम इंडियाचं काय?

काही केल्या आग विझत नव्हती अखेर आग विझल्यानंतर पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेनंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून तपास केला आहे. ही घटना बुधवारी घडल्याचं समोर आलं आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश! निलेश राणेंची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे

फैजान आणि गुफरान(लोहंगी), प्रिन्स पाल आणि जावेद अहमद(कसबा), राम बहादूर यादव(कटरा) यांच्यासह तीन अनोळखी तरुणांना छतावरून पळताना पाहिले असल्याची माहिती जितेंद्र कुमार यांनी दिली आहे. या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांना पीडित मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात नकार दिला, नंतर पोलिसांनी समजवल्यानंतर होकार दिला आहे.

Maratha Reservation : ‘आणखी थोडा वेळ द्या, अपेक्षितच निर्णय होईल’; महाजनांचं मराठा बांधवांना आवाहन

दरम्यान, या प्रकरणी एएसपी हरेंद्र कुमार म्हणाले, घटनास्थळाची पाहणी करून स्थानिक पोलिसांकडून माहिती घेतली. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले. घटनेचा तपास सुरु लवकरच सर्व गुन्हेगारांना अटक करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube